रोहित पवारांची मॅच्युअर इनिंग, आधी राम शिंदेंची घरी जाऊन भेट, आता आदित्य ठाकरेंना फोन

निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष (Political War between Political Parties) आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांवर अगदी तुटून पडतात. अनेक आरोप प्रत्यारोप होतात.

रोहित पवारांची मॅच्युअर इनिंग, आधी राम शिंदेंची घरी जाऊन भेट, आता आदित्य ठाकरेंना फोन

मुंबई: निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष ( Political War between Political Parties) आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांवर अगदी तुटून पडतात. अनेक आरोप प्रत्यारोप होतात. कार्यकर्ते तर आपल्या नेत्यांच्या पुढे जाऊन विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत शत्रुत्व (Political War between Political Parties) घेत वागतात. मात्र, निवडणूक संपली की या सर्वच हेव्या दाव्यांपलीकडे जाऊन एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं असतं. मात्र, यासाठी संबंधित राजकीय नेत्यांनी पुढाकार घेणं आवश्यक असतं. सध्याच्या राजकीय वातावरणात हे होताना दिसत नसलं, तरी याला काही अपवाद निश्चितच आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar wish Aditya Thackeray) हे यातीलच एक राजकीय नेते.

रोहित पवार यांनी आपला प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना स्वतः फोन करुन त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या. नव्या पिढीतील या राजकीय नेत्यांनी निवडणुकीनंतर एकमेकांना दिलेल्या या मैत्रीपूर्ण शुभेच्छांमुळे महाराष्ट्राची खरी सभ्य राजकीय संस्कृती जपली जात असल्याचीही भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर देखील विरोधी पक्ष भाजपचे उमेदवार राम शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच निवडणुकीतील वाद थांबवायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी राहित पवार यांनी यापुढे आपण कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही नमूद केलं होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI