रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं : खा. अमोल कोल्हे

| Updated on: Jun 06, 2020 | 2:43 PM

रायगडाच्या संवर्धनाचं काम का रखडलं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा खासदार संभाजीराजेंना विचारलेला बरा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe On conservation Of Raigad)  म्हणाले.

रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं : खा. अमोल कोल्हे
Follow us on

पुणे : “रायगडाच्या संवर्धनाचं काम का रखडलं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा खासदार संभाजीराजेंना विचारलेला बरा. माझ्या माहितीप्रमाणे काही प्रमाणात काम झालंय पण रायगड सतराव्या शतकात जसा होता तसा बघायला सगळ्यांना आवडेल. ते जगातील आठवं आश्चर्य असेल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. (Amol Kolhe On conservation Of Raigad)

कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागतोय. आज लोकांचं राज्य आलं आहे, खऱ्या अर्थाने हा लोकांचा उत्सव आहे, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत चर्चा झाली. राज्याच्या कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईबद्दल निर्णय होईल, असं खासदार कोल्हे यांनी सांगितलं.

पुणे आणि नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रकल्प मागील 21 वर्षं रखडला होता. आता त्याला गती मिळतेय. मात्र त्याबद्दल कोणी आत्ताच श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकार 20 टक्के आणि राज्य सरकार 20 टक्के वाटा उचलणार आहे. उरलेली 60 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात उभारली जाणार आहे, असं कोल्हे यांनी नमूद केलं.

या प्रकल्पासाठी आत्ता रेल्वे मंत्रालयाकडून प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळालं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये याला प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. (Amol Kolhe On conservation Of Raigad)

संबंधित बातम्या : 

Shivrajyabhishek 2020 | दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव