Sharad Pawar: अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या घोषणेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar: अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 6:43 PM

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणणाऱ्या आजच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्ती होणं म्हणजे अजून एका सातारकरांची मुख्यमत्रीपदी (Maharashtra Chief Minister) वर्णी लागली.. याचा मला आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यामागे देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री पदी बसण्याची लालसा आहे, अशी चर्चा सर्वत्र होत होती. मात्र ऐनवेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं आणि राष्ट्रवादी, काँग्रेस सह शिवसेनेचे नेतेही चक्रावून गेले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आणखी एकजण मुख्यमंत्री झाला, असं समाधान शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवारांचं ट्विट काय?

गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली. त्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. शरद पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आणखी एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा मला अभिमान आहे. शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो…

एकनाथ शिंदेंचं कुटुंब मूळ साताऱ्याचं

एकनाथ शिंदेंचा मतदार संघ ठाणे असला तरीही सातारा जिल्ह्यातलं दरे हे त्यांचं मूळ गाव आहे.  महाबळेश्वरपासून 70 किमी अंतरावरील हे गाव आहे. दरे गावात अवघी 30 घरं आहेत. गावाच्या एका बाजूला जंगल तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. त्यामुळे येथे राहणारे बहुतांश लोक मजूर आहेत.

शिवसेनेची काय प्रतिक्रिया?

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी फडणवीसांच्या घोषणेवर गोंधळलेली प्रतिक्रिया दिली. फडणवीसांचा हा निर्णय धक्कादायक आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी हे आधी पक्षप्रमुखांशी बोलायला हवं होतं, असं त्या म्हणाल्या..

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेच आहे. हा त्यांचा स्वभावच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर आज प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.