मिशन विधानसभा : राष्ट्रवादीच्या 80 जागा निश्चित? रोहित पवारसाठी कर्जत-जामखेड?

लोकसभा निवडणुकीत जोरदार पराभव झाल्यानंतर आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

मिशन विधानसभा : राष्ट्रवादीच्या 80 जागा निश्चित? रोहित पवारसाठी कर्जत-जामखेड?

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) जोरात तयारीला लागली आहे. मुंबईत झालेल्या जिल्हानिहाय बैठकांमध्ये राज्यातील 80 जागांवरील नावं निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून, यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघ निश्चित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत जोरदार पराभव झाल्यानंतर आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये राज्यातील 80 जागांवरील उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवारसाठी कर्जत-जामखेड निश्चित?

विशेष म्हणजे, या 80 नावांमध्ये रोहित पवारांचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेत बारामतीचे सदस्य असून, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते नातू आहेत. रोहित पवार यांनी याआधीच कर्जत-जामखेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे.

या 80 जागांमध्ये अनेक ठिकाणी जुन्या लोकांचं पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर काही निष्क्रीय आमदारांना डच्चू देण्यात आल्याचेही समजतंय. पक्षांतर आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कुठलाही पद्धतीने पक्षाला फटका नको म्हणून राष्ट्रवादीही खबरदारी घेताना दिसते आहे.


Published On - 7:36 pm, Mon, 17 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI