Supreme Court : शिंदे, फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी दाखल करणार याचिका; निवडणुका वेळेत घेण्याची मागणी

शिंदे, फडणवीस सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाांच्या निवडणुका वेळेत घेण्याची मागणी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात येणार आहे.

Supreme Court : शिंदे, फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी दाखल करणार याचिका; निवडणुका वेळेत घेण्याची मागणी
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 10, 2022 | 9:08 AM

मुंबई: शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून (NCP) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाांच्या निवडणुका वेळेत घेण्याची मागणी या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे (Supreme Court) करण्यात येणार आहे. कोर्टानं सांगूनही सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या हा कोर्टाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होणार असून, त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप केला जात आहे. त्या निवडणुकांना ओबीसी आरक्षणाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र या निवडणुका आता वेळेतच घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले असून,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. कोर्ट  या याचिकेवर काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

काय आहे राष्ट्रवादीची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या वेळेवर घेतल्या जाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल करण्यात येणार आहे.  आज राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होणार असून, त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेळेत व्हाव्यात असे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा या निवडणुकांना विलंब होणे म्हणजे कोर्टाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात आज याचिका दाखल केली जाणार आहे.

शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी

दरम्यान दुसरीकडे शुक्रवारी शिवसेनेने भाजप आणि शिंदे सरकारविरोधात दाखल केलेल्या विविध याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  विधानसभेच्या अध्यक्षांची निवड, विश्वासदर्शक ठराव, राज्यापालांनी एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेचे दिलेले निमंत्रण अशा विविध विषयांवर शिवसेनेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.