राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

| Updated on: Jul 03, 2020 | 5:19 PM

भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीत राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. (Chitra Wagh in BJP executive committee).

राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी
Follow us on

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी अखेर जाहीर झाली आहे (Chitra Wagh in BJP executive committee). भाजपच्या राज्यातील नाराज नेत्यांची संख्या पाहता यापैकी कुणाचा राज्य कार्यकारणीत समावेश होणार आणि कुणाचा नाही याविषयी अनेकांना उत्सुकता होती. अखेर ही कार्यकारिणी जाहीर झाल्याने कुणाला स्थान मिळालं आणि कुणाला नाही हे स्पष्ट झालं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राज्यभरातून 12 चेहऱ्यांच्या खांद्यावर प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात चित्रा वाघ यांच्यासह राम शिंदे (अहमदनगर), जयकुमार रावळ (धुळे), संजय कुटे (बुलढाणा), माधव भंडारी (मुंबई), सुरेश हळवणकर (कोल्हापूर), प्रीतम मुंडे (बीड), प्रसाद लाड (मुंबई), माधवी नाईक (ठाणे), कपिल पाटील (भिवंडी), डॉ. भारती पवार (नाशिक), जयप्रकाश ठाकूर (मुंबई) यांचा समावेश आहे.

याशिवाय भाजप महाराष्ट्र कार्यकारिणीवर 5 महामंत्री, एक महामंत्री (संघटन), एक कोषाध्यक्ष, 12 मंत्री यांची नेमणूक करण्यात आली. महिला मोर्चा, युवा मोर्चा अशा 7 मोर्च्यांवर देखील अध्यक्षांची निवड करण्यात आली. विविध सेलचे (प्रकोष्ठ) 18 प्रमुख, प्रदेश कार्यलयाचे 6 प्रभारी, मीडिया विभागात दोन जण आणि सोशल मीडियासाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डावलून चित्रा वाघ यांना स्थान देण्याच्या निर्णयावर भाजपमधील नाराज नेत्यांच्या समर्थकांकडून आक्षेप घेतला जात आहे. पक्षनिष्ठ असलेल्यांना डावलून बाहेरुन आलेल्यांना स्थान दिलं जात असल्याचं मत या नाराज कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

आधी विधानसभा, मग विधानपरिषद, आता कार्यकारिणीतही नाव नाही, भाजपचे ‘संघर्ष’वीर

भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

Chitra Wagh in BJP executive committee