AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News : राज्यघटनेतील ‘हा’ शब्द हटवला जाण्याची शक्यता; विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

PM Narendra Modi Government's Master Plan to Appease Opposition : मोदी सरकार राज्यघटनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत; विशेष अधिवेशनात मोठी घडामोड घडण्याची शक्यता, , विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरू

Big News : राज्यघटनेतील 'हा' शब्द हटवला जाण्याची शक्यता; विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 05, 2023 | 8:46 AM
Share

नवी दिल्ली | 05 सप्टेंबर 2023 : भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधक एकत्र आले आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली. या आघाडीला नाव दिलं ‘इंडिया’. आमची युती सर्व समावेशक आहे, असं इंडियाकडून सांगितलं जातं. ‘इंडिया’ या शब्दातून विरोधकांची ही आघाडी बरंच काही सुचवू पाहहे आहे. मात्र विरोधकांच्या याच  प्रयत्नांना उधळून लावण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. देशाच्या राज्यघटनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. अशात या अधिवेशनाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मोदी सरकारने तातडीने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे या अधिवेशन काळात कोणकोणती विधेयकं मांडली जाणार, याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मोदी सरकार काही मोठी विधेयकं आणणार असल्याची चर्चा आहे.

विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2024 ची निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. अशात ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.

याच विशेष अधिवेशनाच्या काळात देशातील निवडणुकीतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. तसंच याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मोदी सरकार कसोसीचे प्रयत्नही करण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेससह मित्रपक्षांच्या आघाडीला विजयापासून रोखण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल