शिवनेरीनंतर वढू-तुळापूर, संभाजी महाराजांच्या दर्शनानंतर अमोल कोल्हे म्हणाले….

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निवडणूक निकालानंतर पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा, डॉ अमोल कोल्हे यांचा नसून हा विजय छत्रपती संभाजी महाराज यांचा असल्याचं […]

शिवनेरीनंतर वढू-तुळापूर, संभाजी महाराजांच्या दर्शनानंतर अमोल कोल्हे म्हणाले....
| Updated on: May 28, 2019 | 12:12 PM

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निवडणूक निकालानंतर पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा, डॉ अमोल कोल्हे यांचा नसून हा विजय छत्रपती संभाजी महाराज यांचा असल्याचं म्हटलं होतं.

या सर्व पार्श्वभूमीनंतर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम महाराष्ट्राचे शक्तीस्थळ असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू-तुळापूर या ठिकाणी जाऊन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

या वेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वढू तुळापूर येथे शंभू सृष्टी व्हावी, महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिरुर लोकसभा मतदारसंघ

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58,483 मतांनी पराभव केला. आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्री मंडळामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली असती. परंतु कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने ही मंत्री पदाची संधीही हुकली आहे.

संबंधित बातम्या 

या चार मतदारसंघांनी आढळराव पाटलांचा घात केला, अमोल कोल्हेंना जिंकून दिलं  

पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार   

2014 ला कोण किती मतांच्या फरकाने जिंकलं होतं? 

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव