AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव निर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी घेतली अमित शाह आणि  जे.पी. नड्डा यांची भेट

मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन आमदार आशिष शेलार यांना पुन्हा तिसऱ्यांंदा पक्षाने मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काल याबाबत घोषणा पक्षाने केली. त्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा महापौर " आमचाच" होईल अशी घोषणा करुन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नव निर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी घेतली अमित शाह आणि  जे.पी. नड्डा यांची भेट
vanita kamble
vanita kamble | Updated on: Aug 13, 2022 | 9:13 PM
Share

मुंबई : राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर नुकताच मंत्री मंडळ विस्तार देखील झाला आहे. यानंतर भाजपात संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. चंद्रकांत दादा पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानंतर, आता महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि मुंबई भाजपाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मुंबई भाजपाचे अध्यक्षपद (Mumbai BJP president)पुन्हा एकदा माजी शिक्षणमंत्री आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्याकडे देण्यात आले आहे. भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आशिष शेलार यांनी आज नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा(J.P. Nadda) यांची भेट घेतली. भेट घेऊन दोघांचेही आभार मानले असल्याचे शेलार यांनी सांगीतले.

मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन आमदार आशिष शेलार यांना पुन्हा तिसऱ्यांंदा पक्षाने मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काल याबाबत घोषणा पक्षाने केली. त्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा महापौर ” आमचाच” होईल अशी घोषणा करुन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान नियुक्ती नंतर त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. तर आज त्यांनी नवी दिल्लीला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबद्दल त्यांनी म्हटले आहे की, पक्ष संघटनेचे काम करता आम्हाला सदैव मार्गदर्शन, दिशा आणि आशिर्वाद देणारे देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची नवी दिल्ली येथे आज भेट घेतली. मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांचे मनापासून आभार मानले, अशा भावना व्यक्त केली आहे.

अमित शाहा, फडणवीस यांचे विश्वासू

आशिष शेलार  हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे विश्वासू आहेत. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या यशानंतर अमित शाहा यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरलेले आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळात स्थान न देता त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिकाधिक जबाबदार देण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याही ते मर्जीतले मानले जातात. राज्यसभा, विधान परिषद निवडणूक, शिंदे यांचे बंड या सगळ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना अखेरच्या वर्षी संधी मिळाली होती. त्यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वगुणाचा कस लागला होता. आगामी काळात मुंबई महापालिकेत यशानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...