आदित्य ठाकरेंवर बोलताना नितेश राणेंचा तोल गेला, शिवसैनिकांचा राडा, नितेश म्हणाले, ‘शब्द मागे घेतो’!

| Updated on: Jul 07, 2021 | 12:21 PM

वादग्रस्त वक्तव्यानंतर ट्विट करत भावना दुखावल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. (Nitesh Rane Aditya Thackeray)

आदित्य ठाकरेंवर बोलताना नितेश राणेंचा तोल गेला, शिवसैनिकांचा राडा, नितेश म्हणाले, शब्द मागे घेतो!
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे
Follow us on

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा तोल गेला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. आता त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे. (Nitesh Rane Controvercial Statement on Minister Aditya Thackeray Shivsena Karyakarta Agitation)

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भाजप आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली.

काय म्हणाले होते नितेश राणे?

सरकारवर टीका करताना, सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे जास्तच आक्रमक झाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलं होतं.

नितेश यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा राडा

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं.

नितेश राणे यांना उपरती

विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

(Nitesh Rane Controvercial Statement on Minister Aditya Thackeray Shivsena Karyakarta Agitation)

संबंधित बातम्या:

एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार; आदित्य ठाकरे यांचं सूतोवाच

MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या