येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका; नितेश राणेंकडून आघाडीच्या आमदारांना भाजप प्रवेशाचं आवतन

| Updated on: May 02, 2021 | 4:04 PM

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. (nitesh rane reaction on pandharpur by-election result)

येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका; नितेश राणेंकडून आघाडीच्या आमदारांना भाजप प्रवेशाचं आवतन
नितेश राणे, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता महाविकास आघाडीतील आमदारांभोवती जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे. येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका, भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचं आवतनच आघाडीच्या आमदारांना दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (nitesh rane reaction on pandharpur by-election result)

नितेश राणे यांनी ट्विट करून हे आवतन दिलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीमधे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सगळे गल्लोगल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. महाविकास आघाडीमधल्या आमदारांना हा संदेश आहे, येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजप हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे, असं ट्विट राणे यांनी केलं आहे. राणे यांनी या ट्विटमधून आघाडीच्या आमदारांना थेट भाजप प्रवेशाची ऑफरच दिली आहे.

समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

“विजय आमचा निश्चित आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे. त्याची वाट बघतोय. त्यानंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे. फक्त उतावीळपणा नको”, अशी प्रतिक्रिया पंढरपूरमधील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दिली.

 

30 फेऱ्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

आतापर्यंत मतमोजनीच्या 30 फेऱ्यांपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत. सर्व फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार समाधाव आवताडे आघाडीवर दिसत आहेत. सध्याची परिस्थितीत बघता समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय. भाजप नेते प्रशांत पारिचारक यांच्या घरी कार्यकर्ते जमले आहेत. तिथे समाधान अवताडे देखील आहेत. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाल देखील उधळला आहे. विजयाची औपचारिक घोषणा होण्याआधी आम्ही समाधान आवताडे यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असून औपचारिक घोषणेची वाट बघत असल्याचं सांगितलं. (nitesh rane reaction on pandharpur by-election result)

 

संबंधित बातम्या:

Pandharpur Election Result 2021 Live | हा विजय जनतेचा, लोकांची ताकद पाठीशी : समाधान आवताडे

पंढरपुरात भाजपचा विजय हा जनतेने ठाकरे सरकारविरोधात दिलेला कौल, समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया

देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या: छगन भुजबळ

(nitesh rane reaction on pandharpur by-election result)