NMMC Election 2022 : शिंदे ठाकरेंच्या वादात भाजपला लाभ? वॉर्ड क्रमांक 28 कुणाचा?

काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा दिल्याने ठाकरे यांच्या अडचणी या महानगरपालिकेत आणखीच वाढल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणातली ही मोठी उलटापालट या महानगरपालिका निवडणुकीत कोणाच्या पथ्यावर पडणार हा सवाल प्रत्येक नवी मुंबईकरांच्या मनात आहे.

NMMC Election 2022 : शिंदे ठाकरेंच्या वादात भाजपला लाभ? वॉर्ड क्रमांक 28 कुणाचा?
शिंदे ठाकरेंच्या वादात भाजपला लाभ? वॉर्ड क्रमांक 28 कुणाचा?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 4:19 PM

नवी मुंबई : राज्यात सध्या महानगर पालिका निवडणुकींचे (Maharashtra Municipal Corporation Election 2022) पडघम वाजत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (NMMC Election 2022) यंदा सर्वच उलटापालट झाली आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट ही भाजपसाठी लाभदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. तसेच या ठिकाणी भाजपकडे अनुभवी नेते गणेश नाईक (Ganesh Naik) तसेच मंदा म्हात्रे यांच्यासारखे लोकनेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेला या ठिकाणी नेता शोधायची वेळ आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी नगरसेवक, नगरसेवक आणि काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा दिल्याने ठाकरे यांच्या अडचणी या महानगरपालिकेत आणखीच वाढल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणातली ही मोठी उलटापालट या महानगरपालिका निवडणुकीत कोणाच्या पथ्यावर पडणार हा सवाल प्रत्येक नवी मुंबईकरांच्या मनात आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

आकडेवारी काय सांगते?

आता वार्ड क्रमांक 28 मधील लोकसंख्या आणि इतर आकडेवारीवरती एक नजर टाकूया… वार्ड क्रमांक 28 मध्ये लोकसंख्या पाहिल्यास जवळपास 25 हजार 434 अशी आहे. तर अनुसूचित जातीचे 1516 मतदार आहेत. अनुसूचित जमातीचे या वॉर्डमध्ये 234 मतदार आहेत. तर गेल्या वेळेस वॉर्ड ची संख्या ही 111 होती ती आता कमी होऊन 41 वरती आलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा फार मोठा बदल ठरणार आहे. एका वार्ड मधून तीन नगरसेवक निवडून जाणे हे बऱ्याच दिवसांनी नवी मुंबई महानगरपालिका पहात आहे, हे आकडे निश्चितच येणाऱ्या निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

शिवसेनेला सूर गवसणार?

नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा पुन्हा जम बसावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. तसेच आदित्य ठाकरे हे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या गाठीभेटी एकनाथ शिंदे यांना किती रोखणार याबाबत थोडी शंकाच आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवाादी
काँग्रेस
मनसे
इतर

गणेश नाईकांमुळे भाजपची ताकद वाढली

शिवसेनेत लागलेलं आयता भांडण या ठिकाणी भाजपसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. तसेच भाजपची ताकद गणेश नाईक यांच्या येण्याने आधीच मोठी झालेले आहे. गणेश नाईक ज्यावेळेस राष्ट्रवादीत होते त्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादीचाही बराच बोलवाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद ही कमी झालेली आहे.

मनसेही एक्शन मोडमध्ये

दुसरीकडे नवी मुंबई काबीज करण्यासाठी मनसेकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या दौऱ्यावरती दौरे करत आहेत. त्यांनी नवी मुंबईत अनेक कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.