आधी वेळेची, आता डाएटची सक्ती, मोदींकडून मंत्र्यांना बिस्कीट बंदी

| Updated on: Jun 29, 2019 | 6:56 PM

आपल्यापैकी अनेकांसाठी चहा आणि बिस्कीट हाच सकाळचा नाश्ता असतो. मात्र आता याच चहा आणि बिस्कीटांच्या नाश्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुकावे लागणार आहे. कारण आता केंद्रीय मंत्र्यांना चहासोबत बिस्कीटाऐवजी चक्क अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स मिळणार आहेत.

आधी वेळेची, आता डाएटची सक्ती, मोदींकडून मंत्र्यांना बिस्कीट बंदी
Follow us on

नवी दिल्ली : गरम गरम चहा आणि बिस्कीट याचे गेल्या अनेक वर्षापासून वेगळे नाते बनले आहे. आपल्यापैकी अनेकांसाठी चहा आणि बिस्कीट हाच सकाळचा नाश्ता असतो. मात्र आता याच चहा आणि बिस्कीटांच्या नाश्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुकावे लागणार आहे. कारण आता केंद्रीय मंत्र्यांना चहासोबत बिस्कीटाऐवजी चक्क अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स मिळणार आहेत. खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

या परिपत्रकानुसार, येत्या काही दिवसांपासून मंत्रायलयातील कॅन्टीनमध्ये बिस्कीट मिळणार नाही, कारण कॅन्टीनमधून बिस्कीटच हद्दपार करण्यात येणार आहे. मात्र बिस्कीटांऐवजी आता अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स कॅटीनमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंत्र्यांना आता हेच हेल्दी पदार्थ चहासोबत देण्यात येणार असल्याचेही या परिपत्रकात म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या निर्णयाला हिरवा झेंडा दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयाचे सर्व मंत्र्यांनी स्वागत केले आहे. सर्व मंत्री दिवसभर विविध कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पौष्टीक खाद्य पदार्थ खावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे यापुढे मंत्र्यांना चहासोबत पौष्टीक नाश्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अक्रोड, बदाम यासारख्या सुखामेव्यात फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते. तसेच अँटिऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. तर खजूर हे आरोग्यवर्धक असते, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय केंद्रीय मंत्रालयाने फक्त आरोग्यदायी खाद्यच नाही तर प्लास्टिक बंद करण्याकडेही भर दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक विभागातील प्लास्टिक कप हद्दपार केले आहेत. तसेच यापुढे प्रत्येक विभागात काचेची ग्लास वापरण्याचे आदेश दिले  आहेत. तसेच प्लास्टिकच्या बाटल्याही बंद करण्याचे विभागाने ठरवले आहेत.