उमेदवाराचा अर्ज बाद, चिंचवड आणि भोसरीतून घड्याळ हद्दपार

| Updated on: Oct 05, 2019 | 8:35 PM

एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झालाय, तर दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातून पक्षाचं चिन्ह हद्दपार झालं आहे. तर, पिंपरी मतदारसंघातही उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढावली.

उमेदवाराचा अर्ज बाद, चिंचवड आणि भोसरीतून घड्याळ हद्दपार
Follow us on

पुणे : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीवर (Pimpri Chinchwad NCP) मोठी नामुष्की ओढावली आहे. कारण, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघासाठी पक्षाला उमेदवारही देता आले नाही. या दोन मतदारसंघात अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर (Pimpri Chinchwad NCP) आली आहे. एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झालाय, तर दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातून पक्षाचं चिन्ह हद्दपार झालं आहे. तर, पिंपरी मतदारसंघातही उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढावली.

अर्ज छाननीमध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासाठी पक्षातीलच काही जण जबाबदार असल्याचा आरोप केला. शिवाय राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामाही दिला.

चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांना लढत देण्यासाठी विरोधी पक्षांवर मोठी नामुष्की ओढावली आहे. आता सर्व जण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मदत करतात की जगताप याना बाय मिळतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

भोसरीमध्येही राष्ट्रवादीवर नामुष्की ओढावली. पक्षाला अधिकृत उमेदवार न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पुरस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. दुसरीकडे भाजपने महेश लांडगे यांना उमेदवारी देऊन विजयाचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही, भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप

खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे आणि पुरोहितांचे तिकीट का कापलं?

राष्ट्रवादीला धक्का, चिंचवडमधील उमेदवाराचा अर्ज बाद

125 जागांसाठी 40 स्टार प्रचारक, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी