भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

| Updated on: Nov 22, 2020 | 2:25 PM

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. (no Plans For Alliance With MNS in bmc election says devendra fadnavis)

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली
Follow us on

अमरावती: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (no Plans For Alliance With MNS in bmc election says devendra fadnavis)

अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता फेटाळली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे भाजप आणि मनसेची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

या आधी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेच्या वीज दरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेसोबत युती होऊ शकते असं सांगून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप-मनसे युतीचं मोठं आवाहन राहणार असल्याचं बोललं जात होतं. पण फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी अमरावतीत केली. तर हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते,लॉकडाऊनमध्ये वीज बिलात सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या. तीन कॅबिनेट मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. आता म्हणाले अभ्यास झाला नाही त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

संबंधित बातम्या:

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

BMC Election | राष्ट्रवादीचेही ‘मिशन मुंबई’, ठिकठिकाणी मेळावे घेणार

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही

(no Plans For Alliance With MNS in bmc election says devendra fadnavis)