AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election | राष्ट्रवादीचेही ‘मिशन मुंबई’, ठिकठिकाणी मेळावे घेणार, वॉर्डनिहाय पक्षबांधणी करणार; नवाब मलिक यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उतरणार आहे.

BMC Election | राष्ट्रवादीचेही 'मिशन मुंबई', ठिकठिकाणी मेळावे घेणार, वॉर्डनिहाय पक्षबांधणी करणार; नवाब मलिक यांची माहिती
| Updated on: Nov 22, 2020 | 1:08 PM
Share

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) मुंबई महानगरापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (BMC Election) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेतही महापालिका निवडणुकीसंदर्भात खलबतं सुरु झाली आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेत फारसं यश न मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील (NCP) पूर्ण ताकदीसह आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे दिसत आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, “कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादीचे मोठे मेळावे मुंबईत घेतले जातील. तसेच वॉर्डनिहाय पक्षबांधणी मजबूत करण्याचे काम सुरु आहे. युवक आणि महिलांचे गट मजबूत करण्याचं काम सुरु आहे”. (NCP is preparing for Mumbai Municipal Corporation elections : Nawab Malik)

नवाब मलिक म्हणाले की, “राज्याप्रमाणे मुंबई महापालिकेतही महाविकास आघडीतच निवडणूक लढवली जावी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस स्वबळावर लढू असं म्हणत असली तरी अजून 15 महिने आहेत. त्यामुळे निवडणुकीत बरेच बदल होऊ शकतील. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राष्ट्रवादीचं मुंबईकडे दूर्लक्ष झालं आहे आणि ही बाब मान्य करायला हवी. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मुंबईतही आक्रमक होणार आहे. मुंबईतील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेले. परंतु आता मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाची ओळख असणारे नेतेही लक्ष घालणार आहेत”.

मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात राहणार : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांना मुबंई महापालिका निवडणुकीबाबत विचारण्यात आले, तेव्हा पाटील म्हणाले की, “मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही”.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बुधवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीसाठी बुथ स्तरापासून बांधणी करा. राजकारणाचा अभ्यास असलेल्या तरुणांकडे वॉर्डांची जबाबदारी सोपवा, अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या.

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. ठाकरे सरकारचा माज आम्ही उतरवणार आहोत. जनतेच्या पैशांची लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असाही प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला होता.

संबंधित बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित, त्यामुळेच नेते कामाला लागले, जयंत पाटलांचा टोला

(NCP is preparing for Mumbai Municipal Corporation elections : Nawab Malik)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.