मलिक अंबरने जेवढा पाणीप्रश्न सोडवला, तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याला जमला नाही : जितेंद्र आव्हाड

उर्दू ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

मलिक अंबरने जेवढा पाणीप्रश्न सोडवला, तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याला जमला नाही : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad

औरंगाबाद : उर्दू ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. ते 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (Aurangabad Sahitya Sammelan) समारोपाप्रसंगी बोलत होते. मुघल-निजामांच्या काळात मलिक अंबरने औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न जेवढा सोडवला तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याने सोडवला नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

निजामाला पंडित नेहरूंनी विचारलं तुला भारतात रहायचंय की पाकिस्तानत जायचंय तेव्हा निजाम म्हणाला पाकिस्तानात जायचंय, आणि आज त्याचीच काही माणसं इथे काही नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर परिषदांवर राज करत आहेत. मराठवाडा हे क्रांतीचं उगमस्थान आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजामाच्या विरोधात इथली जनता लढत राहिली. मलिक अंबरने औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न जेवढा सोडवला तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याने सोडवला नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

औरंगाबाद ते अजिंठा आणि वेरूळ अशी लोकल ट्रेन सुरू करा याला माझा पाठिंबा आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

उर्दू खरी भारतीय भाषा

उर्दू भाषा ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली. पण तसं नाहीय ती आपली खरी भाषा आहे, असं आव्हाड म्हणाले.

नॉर्मल कॉल नको, व्हॉट्सअॅप कॉल करा

आज सामान्य माणूस सध्या नॉर्मल व्हाईस कॉलवर बोलायला घाबरतो, लगेच व्हॉट्सअॅप कॉल कर म्हणतात, ही अवस्था देशाची आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

अशोक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे औरंगाबाद शहरात 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार (Babu Biradar), मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil), आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता, 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाणांचे वक्तव्य

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्या अशोक चव्हाणांच्या हस्ते, दोन दिवस विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI