41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्या अशोक चव्हाणांच्या हस्ते, दोन दिवस विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

25 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता केंब्रिज ते सावंगी आणि कुंभेफळ ते टाकळी या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येईल.

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्या अशोक चव्हाणांच्या हस्ते, दोन दिवस विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचा शनिवार, रविवारी औरंगाबाद जिल्हा दौरा
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:28 PM

औरंगाबाद: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन औरंगाबादेत होणार आहे. त्यानंतरही औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांना अशोक चव्हाण भेट देतील. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूमिपूजन आणि प्रकल्पांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल.

संमेलनाच्या उद्घाटनानंतर रस्त्याचे भूमिपूजन

25 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता केंब्रिज ते सावंगी आणि कुंभेफळ ते टाकळी या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येईल. कुंभेफळ येथे 14 व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या महिला व बालकांच्या सुसज्ज रुग्णालय इमारतीचे लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. 5 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या औरंगाबाद शहरातील मिल कॉर्नर ते बीबी का मकबरा लेणी रस्त्याचे भूमिपूजन सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार असून, दक्षता व गुणनियंत्रण मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

26 सप्टेंबर रोजी पैठणमधील रस्त्याचे भूमिपूजन

26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पैठण तालुक्यातील बिहामांडवा येथे करण्यात येणाऱ्या तुळजापूर-बिहामांडवा-डोणगाव या रस्त्याचे तसेच बिहामांडवा-नवगांव-आपेगाव रस्त्याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 2.30 वाजता करोडी फाटा येथे 53 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या शरणापूर-शाजापूर रस्त्याचे भूमिपूजनही अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल

41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 आणि 26 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत होत आहे. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच औरंगाबादेतील संमेलनात मराठवाडा तसेच राज्यस्तरीय साहित्यिकांचा मेळा भरत आहे.  त्यामुळे आयोजकांनीही संमेलनासाठी अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचा धांडोळा घेणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन  या दिवसांमध्ये केले आहे. या कार्यक्रमांमध्ये ग्रंथ प्रदर्शन, प्रकट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश करपे यांनी दिली.

इतर बातम्या

औरंगाबादेत मनसे जारी करणार मराठवाड्याच्या विकासाची ब्लू प्रिंट, राज ठाकरेंच्या उपस्थितीत लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा

औरंगाबाद महापालिकेत आता तीन सदस्यीय प्रभाग रचना! तगड्या पक्षांचे फावणार, अपक्षांचा कस लागणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.