Eknath Shinde: आता शिंदे गटाचे मिशन विदर्भ; विदर्भात शिवसेनेला खिंडार पाडणार!

| Updated on: Jul 20, 2022 | 9:20 AM

शिवसेनेला (shiv sena) धक्क्यावर धक्के बसत असताना आता शिंदे गट शिवसेनेला विदर्भात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाकडून 'मिशन विदर्भ'ची सुरुवात करण्यात आली आहे.

Eknath Shinde: आता शिंदे गटाचे मिशन विदर्भ; विदर्भात शिवसेनेला खिंडार पाडणार!
Follow us on

नागपूर: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (shiv sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून सरकार देखील स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आमदारच नव्हे तर शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत असताना आता शिंदे गट शिवसेनेला विदर्भात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाकडून ‘मिशन विदर्भ’ची सुरुवात करण्यात आली आहे. मिशन विदर्भांतर्गत विदर्भातील जास्तीत जास्त शिवसैनिकांना शिंदे गटात सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र असलेल्या किरण पांडव यांच्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काय आहे शिंदे गटाचे मिशन विदर्भ?

विदर्भातील जास्तीत जास्त शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी मिशन विदर्भाची आखणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांचे  मानसपुत्र असलेल्या किरण पांडव यांच्यावर  सोपवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करून घेतले जाणार आहे. विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या मिशन विदर्भमुळे गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  या जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

भावना गवळींचे समर्थक शिंदे गटात सहभागी

दरम्यान या आधीच विदर्भात शिवसेनेला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. भावना गवळींचे समर्थक असलेला एक मोठा गट शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी झाला आहे. यामध्ये आजी, माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा समावेश आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती थांबवण्याचे मोठे आवाहन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.