Nitin Gadkari : आता सॅटेलाईटच्या माध्यमातून टोलवसुली; नितीन गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

आता लवकरच सॅटलाईटद्वारे (Satellite) टोलवसूल (Toll) केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

Nitin Gadkari : आता सॅटेलाईटच्या माध्यमातून टोलवसुली; नितीन गडकरींनी सांगितला नवा प्लॅन
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 10:11 AM

नवी दिल्ली : आता लवकरच सॅटलाईटद्वारे (Satellite) टोलवसूल (Toll) केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. वाहनाच्या नंबर प्लेटच्या (Number plate) मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर सध्या काम सुरू असल्याचे रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची आवश्यकता भासणार नसल्याचे देखील गडकरी म्हणाले आहेत.ते बुधवारी राज्यसभेत बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, अनेकदा टोल चुकवला जातो, त्यामुळे मोठे नुकसान होते, मात्र या अत्याधुनिक सॅटलाईट यंत्रनेच्या माध्यमातून टोल वसुलीमुळे टोल चुकवेगिरीला चाप बसेल. जर तुम्ही टोल चुकवला तर त्यासाठी कायद्यात कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे सरकारचा टोलवसुली धोरणामध्ये अत्याधुनिकता आणून टोल चुकवेगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

काय आहे नवा प्लॅन

याबाबत राज्यसभेत माहिती देताना गडकरी म्हणाले की, सध्या टोल वसुलीची जी प्रचलित पद्धत आहे, याद्वारे देखील काही प्रमाणात टोल चुकवला जातो. तसेच अनेकदा संबंधित वाहनधारकाला जादा पैसे मोजावे लागतात. म्हणजे त्याने जर टोल मार्गावरून केवळ दहा किलोमिटरचाच प्रवास केला असेल तर त्याला पुढील 75 किलोमिटरचे पैसे मोजावे लागतात. मात्र सॅटेलाईटच्या माध्यमातून टोल वसूल केल्यास याला आळा बसेल. जर समजा एखाद्या वाहनचालकाने टोल मार्गावरून दहा किलोमिटरचा प्रवास केला असेल तर त्याला केवळ दहा किलोमिटरपर्यंतचाच टोल लागेल. त्यासाठी वाहन कंपन्यांना आपल्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देखील गडकरी यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

भारत अमेरिकेला मागे टाकणार

यावेळी बोलताना गडकरी यांनी सध्या देशात सुरू असलेल्या महामार्गांच्या कामांची देखील माहिती दिली आहे. देशात सध्या 26 ग्रीन एक्स्प्रेस वेच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर भारत अमेरिकेला देखील मागे टाकेल असे गडकरी यांनी म्हटले आहे.तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.