पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

| Updated on: Aug 17, 2021 | 5:50 PM

शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीवर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन आमदार खोत यांनी ही टीका केली.

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल
सदाभाऊ खोत. शरद पवार
Follow us on

सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीवर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन आमदार खोत यांनी ही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. (Sadabhau Khot criticizes Sharad Pawar on OBC reservation issue)

1992 मध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असं सांगितलं होतं. केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता असं केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांच्या या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘तुमची सत्तेची खुर्ची उगवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार?’

शरद पवार साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही कधीतरी खरं बोलणार आहात का? अजून किती वर्षे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात? तसेच तुमची राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केलीय. 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिला नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात फेटाळला गेला. मात्र आता घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्हा आता परत केंद्राकडे का बोट दाखवता? असा सवालही खोत यांनी विचारलाय.

’60 वर्षे सत्तेत होता तेव्हा घटनादुरुस्ती का केली नाही?’

पहिल्यांदा ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा. मगच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल. मात्र, तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि बोट मात्र केंद्राकडे दाखवणार. मराठा समाज मागासलेला कसा आहे, याचा डेटा गोळा करावे लागले आणि तो मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून गोळा करावा लागेल. पण हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार. तसंच तुम्ही केंद्रात आणि राज्यात साठ वर्षात सत्तेत होता, मग तेव्हा घटनादुरुस्ती का केली नाही? तुमचे हात कोणी बांधले होते का? असा सवालही खोत यांनी पवारांना विचारलाय.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता खुद्द शरद पवारांकडून उत्तर

‘शरद पवारांचं ओबीसी प्रेम अचानकपणे उफाळून आलं, हेतू काय?’, आमदार गोपीचंद पडळकरांचा खोचक सवाल

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar on OBC reservation issue