पटोले म्हणतात, फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ, बावनकुळेंच्या दुखत्या नसीवरही बोट !

| Updated on: Jun 27, 2021 | 7:43 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या ओबीसी संदर्भातल्या घोषणांवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, फडणवीस म्हणतात की, चार महिन्यात ओबीसीचं आरक्षण आणून देतो, ते कुठून आणून देणार ते माहित नाही

पटोले म्हणतात, फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ, बावनकुळेंच्या दुखत्या नसीवरही बोट !
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

लोणावळा : ओबीसींच्या इम्पेरिकल डाटावरून सध्या भाजपा नेते आणि राज्यातले इतर ओबीसी नेते यांच्यात मतभेद आहेत. वाद होत आहेत. ठाकरे सरकारमधले ओबीसी नेते म्हणतात, ओबीसींचा इम्पेरिकल डाटा मोदी सरकार देत नाही तर भाजपचे राज्यातले नेते म्हणतात, हे काम राज्य सरकारचं आहे. त्यात देवेंद्र फडणवीस विरुद्ध ठाकरे सरकारचे मंत्री असा वाद होताना दिसतोय. आज त्यावर नाना पटोले यांनीही टीका केली. काही सवाल केले. (Nana Patole’s statement to go to Central Government led by Devendra Fadnavis)

काय म्हणाले नाना पटोले?

लोणावळ्यात ओबीसी व्हीजेएनटी चिंतन शिबिर पार पडलं. ह्या शिबिरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांच्या ओबीसी संदर्भातल्या घोषणांवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, फडणवीस म्हणतात की, चार महिन्यात ओबीसीचं आरक्षण आणून देतो, ते कुठून आणून देणार ते माहित नाही. पुढं पटोले असही म्हणाले की, आपण फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ.

फडणवीस काय म्हणाले होते?

भाजपानं 26 जूनला राज्यभर ओबीसींच्या आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन केलं. त्यानंतर एके ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ह्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचंच नाहीय, उठसुठ हे केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, सुत्रं हाती द्या चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसीचं आरक्षण पुन्हा आणतो. तसं नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन.

बावनकुळेंच्या दुखत्या नसीवर बोट

भाजपानं ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढं केलं आहे. भाजपचे हे दोन्ही नेते जिथेही जातात तिथं भाजपानेच त्यांना कशी वागणूक दिली त्यावर इतर नेते बोट ठेवतात. ओबीसींच्या शिबिरातही तसं झालं. वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंना कसं कमी महत्वाचं मंत्रीपद दिलं गेलं ते सांगितलं तर बावनकुळेंना भाजपानं न दिलेल्या तिकिटावर पटोलेंनी बोट ठेवलं. ते म्हणाले– बावनकुळे साहेब, आपलं आपल्याला करायचं आहे. दुसरे नाही करणार. बावनकुळे यांना तिकिट मिळालं नाही, तर ओबीसी समाज नाराज झाला. पुढं पटोले असही म्हणाले की, आरक्षण जाणे हे शुभ संकेत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज एकत्र आला. पुढच्या काळात कुठलेही राजकीय पक्ष ओबीसी / व्हीजेएनटीच्या वाट्याला गेले तर आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित बातम्या :

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट, पटोले म्हणतात, बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? वाचा ओबीसी परिषदेवर स्पेशल रिपोर्ट

झुकायला अन् वाकायला तयार, जेव्हा वडेट्टीवार ओबीसींच्या काळजाला हात घालतात, वाचा 15 मोठे मुद्दे

Nana Patole’s statement to go to Central Government led by Devendra Fadnavis