विरोधी पक्षांना भाजपचे आकर्षण, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

| Updated on: Jul 28, 2019 | 2:47 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहे. मात्र त्यातील काही निवडक लोकांना आम्ही पक्षात घेऊ. तसेच विरोधी पक्षांना भाजपचे आकर्षण आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

विरोधी पक्षांना भाजपचे आकर्षण, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला
Follow us on

मुंबई : “राष्ट्रवादीत राहण्यास लोक का तयार नाहीत याचे आत्मचिंतन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने करावे. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.” तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहे. मात्र त्यातील काही निवडक लोकांना आम्ही पक्षात घेऊ. तसेच विरोधी पक्षांना भाजपचे आकर्षण आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

भाजपात आता अनेक बदल झाले आहेत. सर्व जनतेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. भाजप आता कोणाच्या मागे धावणारा पक्ष उरलेला नाही. त्यामुळे आता कोणावरही दबाव टाकून लोकं पक्षात घ्यावी अशी अवस्था भाजपची झालेले नाही. तसेच मी फोडाफोडीचे राजकारण कधीही केलेले नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“सद्यस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत. मात्र यात ज्या लोकांची ईडीची चौकशी सुरु आहे अशा लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही. तसेच अशा लोकांची आम्हाला गरजही नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.”

त्याशिवाय पक्षात येणाऱ्यापैकी काही निवडक, लोकाभिमुख लोकांना आम्ही घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यावेळी साखर कारखाने अडचणीत होते, त्यावेळी आम्ही अनेकांना मदत केली होती. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते शरद पवार

“निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारीला लागतात. त्यानुसार विविध पक्षातील नेते या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात आहेत. पण त्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. त्यांना ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत धमकावलं जात आहे. तसेच  लोकप्रतिनिधीवर दडपण आणून राजकीय सत्तेचा गैरवापर केला जातोय अशी टीकाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.”

पक्ष सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना धमकवले जात आहे. धमकी देण्यासाठी राज्य बँकेचाही वापर केला जात असल्याचेही खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले. तसेच संस्थाचालकावर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सत्तेचा इतका टोकाचा गैरवापर होताना आतापर्यंत मी पाहिलेला नाही असेही टीका शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

संबंधित बातम्या : 

नेत्यांच्या पक्षांतरांसाठी भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा वापर : शरद पवार