ठग्स ऑफ महाराष्ट्र, विरोधकांची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंवर पोस्टरबाजी

मुंबई : ठग्स ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. आता या सिनेमाच्या टायटलचाच आधार घेत राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठग्स ऑफ महाराष्ट्र असं दाखवण्यात आलं आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पण ठगबाजीची चार वर्षे अशी टॅगलाईन विरोधकांनी दिली आहे. …

, ठग्स ऑफ महाराष्ट्र, विरोधकांची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंवर पोस्टरबाजी

मुंबई : ठग्स ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. आता या सिनेमाच्या टायटलचाच आधार घेत राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठग्स ऑफ महाराष्ट्र असं दाखवण्यात आलं आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पण ठगबाजीची चार वर्षे अशी टॅगलाईन विरोधकांनी दिली आहे.

ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमातील अभिनेता आमिर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षातील गटनेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषदही झाली.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील, धनजंय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने ती पोहोचली नाही. सरकारने दुष्काळ जाहीर करायला विलंब केला. शेतकरी सरण रचून आत्महत्या करत आहेत. ही वेळ या सरकारने आणली. त्यांनी जनतेला ठगवलं, अशी टीका विखे पाटलांनी केली.

जलयुक्त शिवारवरही विखे पाटलांनी टीका केली. जी 16 हजार गावं दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त झाली, त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश आहे. ग्रामीण भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. तरीही सरकार अटी आणि निकष ठेवत दुष्काळ जाहीर करत आहे, असा आरोप विखे पाटलांनी केला.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल फुटत नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल फुटतो म्हणजेच काही तरी काळबेरं आहे का? असा सवाल करत या अहवाल फुटीच्या विरोधात हक्कभंग मांडणार असल्याची घोषणा विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं. लोकांची टँकरची मागणीही पूर्ण झालेली नाही. जनावरांना चारा नाही, शेतकरी व शेतमजुरांना ईजीएसद्वारेही काम नाही. खरिपाचं पीक गेलं, रब्बीच्या पेरण्याही झाल्या नाहीत. हा महाभयंकर दुष्काळ गांभीर्याने न घेता सरकार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा अपमान करत आहे, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *