हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

| Updated on: Jan 09, 2020 | 5:45 PM

आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ (solapur tanaji sawant banner) दिली.

हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी
Follow us on

सोलापूर : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ (solapur tanaji sawant banner) दिली. या कारणामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

“उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” अशा आशयाचे बॅनर सोलापूरमध्ये लावण्यात आले आहेत. यात तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करण्यात आला आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौक परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड (solapur tanaji sawant banner) झाली.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या उद्योगाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तानाजी सावंत अनुपस्थितीत होते. विशेष अधिवेशनादरम्यानही तानाजी सावंंत गैरहजर होते.

“तानाजी सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे आढावा बैठकीवर फारसा फरक पडला नाही. तानाजी सावंत अनुपस्थित असले तरी इतर आमदार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या उद्योगाचा आढावा घेतला. त्या बैठकीत कुठल्या प्रकारच्या बंडखोरीबद्दल किंवा नाराजीबद्दल चर्चा झाली नाही.” अशी प्रतिक्रिया उमरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी (solapur tanaji sawant banner) दिली.