उत्तर भारतात काँग्रेस नाही, ‘इतर’ पक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी आपापला प्रचार सुरु केलाय. मोदी सरकारला विकासकामांच्या मुद्द्यावर 2014 एवढं बहुमत मिळणार का, या देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येणार का, असे अनेक प्रश्न आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या सर्व्हेंनुसार, भाजपला देशभरात मोठा फटका बसणार आहे. कार्वी इनसाईट्सच्या सर्व्हेनुसार, उत्तर भारतात एनडीएचाच दबदबा […]

उत्तर भारतात काँग्रेस नाही, इतर पक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार!
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी आपापला प्रचार सुरु केलाय. मोदी सरकारला विकासकामांच्या मुद्द्यावर 2014 एवढं बहुमत मिळणार का, या देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येणार का, असे अनेक प्रश्न आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या सर्व्हेंनुसार, भाजपला देशभरात मोठा फटका बसणार आहे.

कार्वी इनसाईट्सच्या सर्व्हेनुसार, उत्तर भारतात एनडीएचाच दबदबा असेल. उत्तर भारतात दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश होतो. सर्व्हेनुसार, इथे भाजपप्रणित एनडीएला 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतील. तर यूपीएला निम्मे म्हणजेच 23 टक्के मतं मिळताना दिसत आहेत. या राज्यांमध्ये इतर पक्ष एनडीएला टक्कर देताना दिसत आहेत. इतर पक्षांना इथे 37 टक्के मतं मिळत आहेत.

मतांच्या टक्केवारीचं रुपांतर जागांमध्ये केलं तर उत्तर भारतात एनडीएला 66 जागा मिळतील. इतर पक्षांचीही अशीच कामगिरी असण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या खात्यात 65 जागा जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएला 20 जागा मिळताना दिसत आहेत.

एनडीएमध्ये भाजप, शिवसेना, ऑल इंडिया एन रंगास्वामी काँग्रेस, अपना दल, बोडो पीपल्स फ्रंट, एमडीए, जेडीयू, एलजेपी, नागा पीपल्स फ्रंट, पीएमके, नॅशनल पीपल्स फ्रंट, आरपीआय (आठवले गट), अकाली दल आणि सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षांचा समावेश आहे.

यूपीएमध्ये काँग्रेससह डीएमके, जेडीएस, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणि), आययूएमएल, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, आरएलडी आणि टीडीपी यांचा समावेश आहे.

इतर पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, आसाम गण परिषद, एआयएडीएमके, फॉरवर्ड ब्लॉक, तृणमूल काँग्रेस, एआययूडीएफ, बिजू जनता दल, सीपीआय, सीपीआयएम, इंडियन नॅशनल लोकदल, पीपल्स ड्रेमोक्रेटिक पार्टी, केरळ काँग्रेस (जोसेफ), मनसे, एनएलपी, आरएसपी, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, अपक्ष, सपा-बसपा-आरएलडी आघाडी यांचा समावेश आहे.