GDP वरुन कोर्ट रुमबाहेर चिदंबरम यांचा मोदी सरकारला टोमणा, CBI कोठडीच्या प्रश्नावर म्हणाले 5% – 5%!

| Updated on: Sep 03, 2019 | 7:54 PM

कोर्टरुममधून बाहेर पडलेल्या चिदंबरम (P Chidambaram) यांना पत्रकारांनी कोर्टाच्या निर्णयाबाबत विचारलं.

GDP वरुन कोर्ट रुमबाहेर चिदंबरम यांचा मोदी सरकारला टोमणा, CBI कोठडीच्या प्रश्नावर म्हणाले 5% - 5%!
Follow us on

नवी दिल्ली : INX मीडिया प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी, घसरलेल्या जीडीपीवरुन (GDP) मोदी सरकरला टोला लगावला. जीडीपीमध्ये (GDP) घट होऊन तो सहा वर्षातील निचांकी स्थरावर म्हणजे 5 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित हा जीडीपी 8 टक्क्यांवर होता.

कोर्टरुममधून बाहेर पडलेल्या चिदंबरम (P Chidambaram) यांना पत्रकारांनी कोर्टाच्या निर्णयाबाबत विचारलं. त्यावर चिदंबरम यांनी कोसळलेल्या जीडीपीचा धागा पकडून, हाताची बोटे दाखवत 5 टक्के, 5 टक्के असं सांगितलं.  कोर्टाने चिदंबरम यांना गुरुवारपर्यंत सीबीआय कोर्टातच ठेवण्यास बजावलं आहे.

या निर्णयानंतर चिदंबरम कोर्ट रुमबाहेर आले. त्यावेळी पत्रकारांनी चिदंबरम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिदंबरम यांनी 5 टक्के… 5 टक्के काय आहे आपल्याला माहित आहे का? असं विचारत चिदंबरम यांनी 5 बोटे दाखवली.

 काँग्रेसने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

सीबीआय कोठडी

दरम्यान, सीबीआय कोठडीत असलेल्या पी चिदंबरम यांच्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्ट आता गुरुवारी करणार आहे. तोपर्यंत त्यांची सीबीआय कोठडी कायम राहील. कोर्टात सीबीआयकडून तुषार मेहता हे युक्तीवाद करत आहेत. “चिदंबरम यांना जेलमध्ये जायचं नाही. मात्र कायदा आपलं काम करेल. अंतरिम जामीनासाठीची याचिकाच सुनावणीसाठी योग्य नाही ” असं तुषार मेहता म्हणाले.

दरम्यान, चिदंबरम यांच्याकडून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तीवाद करत आहेत.

संबंधित बातम्या 

जामीन नाकारला, चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय रिमांड   

मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या महिलेची साक्ष चिदंबरम यांना महागात