अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

आमच्या काळात पीक विमा लाखोंनी आला. या दोन वर्षात फक्त मोदींचे दोन हजार रुपये आले. मात्र, राज्य सरकारनं काहीही दिलं नाही. आम्ही जे सेवा बघितली त्यात आम्ही जात आणि राजकारण पाहिलं नाही. आम्ही विकास पाहिला. तुम्हाला संधी दिली आहे, तर जनतेची सेवा करा. आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पाकलकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल
पंकजा मुंडेकडून शेती नुकसानाची पाहणी
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 3:54 PM

परळी : महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसानं आणि सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. भाजच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होत्या. (Pankaja Munde demands compensation to farmers, Criticism of Jayant Patil and Dhananjay Munde)

आमच्या काळात पीक विमा लाखोंनी आला. या दोन वर्षात फक्त मोदींचे दोन हजार रुपये आले. मात्र, राज्य सरकारनं काहीही दिलं नाही. आम्ही जे सेवा बघितली त्यात आम्ही जात आणि राजकारण पाहिलं नाही. आम्ही विकास पाहिला. तुम्हाला संधी दिली आहे, तर जनतेची सेवा करा. आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पाकलकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या. सामान्य माणसासाठी लढाई करायची आहे. दोन तास पक्षासाठी काम करा, असं आवाहन त्यांनी केलंय.

‘रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहणी करु नका’

पूर परिस्थितीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्याकडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

ठरविले तर मराठवाड्याला न्याय देऊ शकतील

जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. मराठावाड्याला न्याय देण्यासाठी जयंत पाटील पावले उचलतील अशी मला अपेक्षा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जयंत पाटलांच्या बीड दौऱ्यावर पंकजा मुंडेंची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. तसंच गेवराई, माजलगाव आणि परळीत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. जयंत पाटील यांच्या या दौऱ्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केलीय. बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

इतर बातम्या :

‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका

माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती; परळीकरांच्या जंगी सत्काराने जयंत पाटील भावूक

Pankaja Munde demands compensation to farmers, Criticism of Jayant Patil and Dhananjay Munde