माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती; परळीकरांच्या जंगी सत्काराने जयंत पाटील भावूक

राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल बीड जिल्ह्यात होते. काल संध्याकाळी ते परळीत पोहोचले. त्यावेळी त्यांचं प्रचंड जंगी स्वागत करण्यात आलं. ( Jayant Patil)

माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती; परळीकरांच्या जंगी सत्काराने जयंत पाटील भावूक
Jayant Patil

बीड: राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल बीड जिल्ह्यात होते. काल संध्याकाळी ते परळीत पोहोचले. त्यावेळी त्यांचं प्रचंड जंगी स्वागत करण्यात आलं. परळीकरांनी केलेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे जयंत पाटीलही भारावून गेले होते. माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. (NCP maharashtra president Jayant Patil address in beed rally)

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्व सुरू झालं आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले.

धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित आहे. येत्या काही वर्षात परळी मतदारसंघाचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी ज्या जल्लोषात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते, अगदी त्याच जल्लोष व धो धो पडत असलेल्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. “माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती” अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी यावेळी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पाटील यांनी बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला. बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे आहे. तसेच राज्यसरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

धनुभाऊ आणि त्यांची टीम झाली पास

यावेळी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी परिपूर्ण असून इथे आढावा घेण्याची गरजच नाही. इथे पक्ष संघटना अगदी परिपूर्ण आहे. पक्षाच्या आढावा बैठकीच्या बाबतीत धनुभाऊ आणि त्यांची टीम ‘पास’ झाली, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धनुभाऊ लहान भावाप्रमाणे

मोठा होणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या टीका करून त्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. आमच्या धनुभाऊंवर देखील असेच आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु मी कायम त्यांच्या पाठीशी आहे. माझं त्यांच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम आहे व ते कायम राहील, असे सांगत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही: मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी मला संधी दिली आणि आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.

या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवकन्या सिरसाट, जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार उषाताई दराडे, सुदामती ताई गुट्टे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, रामेश्वर मुंडे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, परळीच्या नगराध्यक्ष सौ. सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मतदारसंघ अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, दत्ता आबा पाटील, परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती गोविंदराव फड, शिवाजी सिरसाट, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह महिला आघाडीच्या हेमाताई पिंपळे, जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्या व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (NCP maharashtra president Jayant Patil address in beed rally)

 

संबंधित बातम्या:

परळीत पुढील 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही : जयंत पाटील

VIDEO | माझ्या घरातल्यांना माझे गुण कळले नाहीत, परळीतून धनंजय मुंडेंची तुफान फटकेबाजी

गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

(NCP maharashtra president Jayant Patil address in beed rally)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI