Modi | अफगाण पगडी घालून मोदींची अफगणिस्तानातील शीख आणि हिंदू शिष्टमंडळासोबत चर्चा

| Updated on: Feb 19, 2022 | 5:36 PM

Narendra Modi : काबूल, अफगाणिस्तानातून निदान सिंह सचदेवा यांचं तालिबानने (Afghanistan) अपहरण केलं होतं, असं खुद्द निदान सिंह सचदेवा यांनी म्हटलंय. ANI वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी आपल्या अपहरणाबाबत वक्तव्य केलं आहे.

Modi | अफगाण पगडी घालून मोदींची अफगणिस्तानातील शीख आणि हिंदू शिष्टमंडळासोबत चर्चा
अफगणिस्तानातील शिष्टमंडळासोबत काढण्यात आलेला मोदींचा फोटो (Source - ANI)
Follow us on

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू शिष्टमंडळाने (Afghan Sikh-Hindu) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भारतात अफगाण शीख आणि हिंदू मोठ्या संख्येने आहे. तर अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर भारत सरकारने त्यांच्यापैकी अनेक नागरिकांना सुरक्षितरीत्या तालिबानच्या तावडीतून बाहेर काढलं होतं. अफगाणिस्तानमध्ये धार्मिक आधारावर छळ होत असलेल्या अल्पसंख्याकांसाठी मोदी सरकारने अनेकदा चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, काबूल, अफगाणिस्तानातून निदान सिंह सचदेवा यांचं तालिबानने (Afghanistan) अपहरण केलं होतं, असं खुद्द निदान सिंह सचदेवा यांनी म्हटलंय. ANI वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी आपल्या अपहरणाबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी शिष्टमंडळानं मोदींना एक खास पगडीही भेट दिली. ही पगडी मोदींनी घातलीही होती. या भेटीदरम्याचे फोटो ANIनं शेअर केले आहेत.

निदान सिंह सचदेवा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की,

‘माझं एका गुरुद्वारातून तालिबान्यांनी अपहरण केलं होतं. तालिबान्यांनी आम्हाला भारतीय हेर समजून आमचं अपहरण केलं. आम्ही धर्मांतर करावं, अशी त्यांची इच्छा होती. आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि भारत सरकारच्या मदतीमुळे आम्ही आज सुरक्षित आहोत. आपल्याला फक्त निवारा आणि राष्ट्रीयत्व हवे आहे.

तर दुसरीकडे 1989 मध्ये भारतात येऊन स्थलांतरीत झालेले अफगाणिस्तानचे रहिवासी तारेंद्र सिंग यांनी म्हटलंय, की

‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबूलमधील आमच्या कठीण परिस्थितीची माहिती दिली होती. आमचा मुख्य प्रश्न हा नागरिकत्वासंबंधी होता. आम्ही आमच्या नागरिकत्वासाठी इकडे तिकडे भरकटत राहिलो. म्हणूनच आम्ही CAA आणल्याबद्दल आणि नागरिकत्व हवं असल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही मानलेत.

यावेळी शीख शिष्टमंडळाने सीएएसाठी केंद्र सरकारचे कौतुक केलेय. त्यांनी अफगाण निर्वासितांना आश्रय दिल्याबाबतही आभार मानलेत. भारत देश हा आपल्या घरासारखाच आहे, असं तुम्ही समजा, असं पंतप्रधान मोदींनी या शिष्टमंडळाला उद्देशून म्हटलंय. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्देशून म्हटलंय, की ‘तुम्ही आमच्यासाठी पाहुणे नाही आहात. प्रत्येक भारतीयाला तुमच्याबद्दल तितकाच आदर आणि प्रेम आहे.

मोदींना अफगाण पगडी भेट दिली

शेजारील दक्षिण आशियाई देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी विविध पावले उचलल्याबद्दल या शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केलंय. ‘जेव्हा कोणी ऐकत नव्हते, तेव्हा तुम्हीच आमचे ऐकत होता, असं या शिष्टमंडळानं मोदींना म्हटलंय. यावेळी शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींना अफगाण पगडी भेट दिली. अफगाण पगडी ही अफगाणिस्तानचं प्रतीक म्हणून ओळकली जाते. मोदींनीही ही पगडी घातली. यामुळे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांना नक्कीच आनंद झाला असेल, असा विश्वास यावेळी शिष्यमंडळानं व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या :

रशिया आजच यूक्रेनवर हल्ला करणार? 24 फोटोतून समजून घ्या काय घडतंय युद्धभूमीवर?

Video | जवाहरलाल नेहरुंचं नाव घेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राजकारण्यांचे कान टोचले!

Viral : ब्राझीलमध्ये हाहाकार..! अतिवृष्टी आणि भूस्खलनानं विद्ध्वंस, flood video पाहुन अंगावर येईल काटा