पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द

| Updated on: May 24, 2019 | 7:31 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा दिला आणि सध्याची लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली. कॅबिनेटची मंजुरी आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून यावर कार्यवाही केली जाते. एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना गटनेता निवडलं जाईल आणि त्यानंतर ते पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा 30 मे रोजी होणार असल्याचं बोललं […]

पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा दिला आणि सध्याची लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली. कॅबिनेटची मंजुरी आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून यावर कार्यवाही केली जाते. एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना गटनेता निवडलं जाईल आणि त्यानंतर ते पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा 30 मे रोजी होणार असल्याचं बोललं जातंय.

सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपत आहे. त्यामुळे 3 जूनपूर्वी सतराव्या लोकसभेची नियुक्ती होईल. तीन निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी देतील आणि संसदेच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु होईल. या सर्व प्रक्रियेनंतर राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करुन शपथ देतील. पंतप्रधानांच्या शिफारशीने राष्ट्रपतीकडून मंत्र्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा होईल.

नव्या सरकारमधून अरुण जेटलींची माघार?

विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं बोललं जातंय. कारण, त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे अर्थखातं पियुष गोयल यांना दिलं जाऊ शकतं. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे, कारण देशभरातील सदस्य घेऊन सर्वसमावेशक मंत्रीमंडळ निर्माण करण्याची नीती असल्याची माहिती आहे.

मंत्रीमंडळ वाटपामध्ये एनडीएतील मित्रपक्षांनाही महत्त्वाची पदं दिली जाणार आहेत. भाजपप्रणित एनडीएने 542 पैकी 350 पेक्षा जास्त जागा जिंकत स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपनेच 300 चा आकडा पार केलाय. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवण्याचा विक्रम मोदींनी केलाय.

VIDEO :