एआयमुळे नोकऱ्या जाणार का? PM नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले, म्हणाले..

जगासहित भारतात एआयचा वापर वाढला आहे. या एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. याच एआयवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं.

एआयमुळे नोकऱ्या जाणार का? PM नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले, म्हणाले..
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 7:40 AM

भारतासहित जगभरात एआयचा वापर वाढला आहे. याच एआयने अनेकांची झोप उडवली आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा दावा केला जात आहे. काहींना एआयमुळे नोकरी गमावण्याची वेळ देखील आली आहे.  एआयने भारतातील तरुणांना चिंतेत टाकलं आहे. याच एआयवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये मोठं भाष्य केलं आहे. ज्यांच्याकडे कौशल्य, कला असेल, त्यांचा रोजगार जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या गोमती नगरच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन पहिल्यांदा दिल्लीच्या बाहेर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आयटीआय, एनएसटीआय आणि आयटीओटीच्या 52 राष्ट्रीय स्तरावरील गुणवंताचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमाच्या मंचावरून मोदींनी एआयवर मोठं भाष्य केलं. ज्यांच्याकडे कला आहे, त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

Loading...

PM नरेंद्र मोदी एआयवर काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एआयवर भाष्य करत तरुणांना दिलासा दिला. त्यांनी म्हटलं की, तंत्रज्ञान बदलत राहील. परंतु ज्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांची मागणी कायम राहील. येत्या काळात कौशल्य असलेल्या लोकांची मागणी आणखी वाढेल. आता बाजारपेठ ही कागदपत्रांवर अवलंबून राहणार नाही’, पुढे मोदी म्हणाले की,  हातात सर्टिफिकेट घेऊन कोट, पँट आणि टाय घालून फिरणाऱ्यांपेक्षा कौशल्य असलेले तरुण, कर्मचाऱ्यांना अधिक महत्व दिले जाईल. आता डिग्रीपेक्षा तुम्ही किती चांगल्या प्रकारे काम करतात, हे अधिक महत्वाचं राहील’. यावेळी त्यांनी तरुणांना मोठं स्वप्न पाहण्याचं आवाहन केलं.

‘आता पुढील 20 वर्ष हे कौशल्य असलेल्या तरूणांची आहेत. 2047 पर्यंत विकसित उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. परंतु कौशल्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही, असंही मोदींनी अधोरेखित केलं. आता पुढील दोन दशकांत कौशल्य ही सर्वात महत्वाची गरज असणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us