Narendra Modi Speech : ‘देशात 2 मोठ्या समस्या, भ्रष्ट्राचार आणि घराणेशाही!’ लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोंदींनी विरोधकांना डिवचलं

| Updated on: Aug 15, 2022 | 9:36 AM

Narendra Modi 2022 : घराणेशाहीवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज व्यक्त केली.

Narendra Modi Speech : देशात 2 मोठ्या समस्या, भ्रष्ट्राचार आणि घराणेशाही! लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोंदींनी विरोधकांना डिवचलं
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech 2022) यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात विरोधकांना डिवचलंय. देशात अनेक गंभीर समस्या आहेत. पण त्यातील दोघांवर मी भाष्य करणार आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर (Narendra Modi on Opposition) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. देशात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन समस्यांनी ग्रासलंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 75व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याशिवाय देशाला विकसीत करण्यासाठी या दोन समस्यांना सगळ्यात आधी तोंड द्यावं लागेल, असं सूचित केलं. दरम्यान, जोपर्यंत भ्रष्टाचाराप्रती घृणा आणि द्वेष प्रत्येक भारतीयाचा मनात निर्माण होत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचाराची मानसिकता संपवणं कठीण आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भ्रष्टाचाराविषयी (Corruption in India) द्वेष निर्माण होण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

घराणेशाहीवर निशाणा

घराणेशाहीवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज व्यक्त केली. घराणेशाहीविरोधात मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की फक्त राजकीय विधानं करतो आहेत. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना डिवचलंय. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जात असल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र भारत अनुभवतोय आणि त्याचा फटका भारताला बसतोय, असंही ते म्हणाले.

पाहा नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन टोला

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ज्यांनी देशातील पैसा लुटलाय, त्यांना तो परतही करावा लागेल, असंही ते म्हणालेत. दरम्यान, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडी, इनकम टॅक्स, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे समर्थनच केल्याचं बोललं जातंय. भ्रष्टाचारामुळे देख पोखरला जात असल्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढावंच लागेल, असंही ते म्हणाले.