जनतेनं मतदानाआधीच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, मोदींचा पवारांना टोला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

वर्धा : जनतेने मतदानाच्या आधीच अनेकांना मैदाना सोडून पळवलंय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शिवाय, शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटत असून, त्यांच्या पुतण्याने (अजित पवार) पक्षावर पकड वाढवली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वर्धा शहरात पंतप्रधान […]

जनतेनं मतदानाआधीच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, मोदींचा पवारांना टोला
Follow us on

वर्धा : जनतेने मतदानाच्या आधीच अनेकांना मैदाना सोडून पळवलंय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शिवाय, शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटत असून, त्यांच्या पुतण्याने (अजित पवार) पक्षावर पकड वाढवली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वर्धा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तुफान टीका केली. ‘हिंदू दहशतवाद’ शब्द काँग्रेसने आणल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

“वर्ध्यातून महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. वर्ध्यातील लोकांचं प्रेम पाहता, माहित नाही या काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होईल?”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेलं कौटुंबिक युद्ध ही विरोधकांची सर्वात मोठी समस्या आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निसटून चालला आहे. पवारांचे पुतणे (अजित पवार) पक्षावर पकड मिळवत आहेत. म्हणून तिकीट वाटपात अडचणी येत आहेत. पवार कुटुंबातील वादांमुळे इतरांमध्ये संभ्रम वाढत आहे.”, असे म्हणत नरेंद्र मोदी यांना पवार कुटुंबावर निशाणा साधला.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी म्हणजे कुंभकर्णासारखी आहे. जेव्हा सत्तेत असतात, तेव्हा 6-6 महिने झोपा काढतात. सहा महिन्यातून एखादा जागा होतो आणि भ्रष्टाचार करून पुन्हा झोपी जातो. पैशांची भूक भागवण्यासाठी जे क्षेत्र मिळेल, तिथे आघाडीतले नेते भ्रष्टाचार करतात.” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

– इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सर्वप्रथम अभिनंदन, त्यांनी काही वेळापूर्वीच अंतराळात उपग्रह सोडून यशस्वी कामगिरी केलीय – नरेंद्र मोदी
– वर्ध्यातून महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात करायला मिळालं, हे माझं भाग्य – नरेंद्र मोदी
– वर्ध्यातील लोकांचं प्रेम पाहता, माहित नाही या काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होईल? – नरेंद्र मोदी
– महाराष्ट्रासाठी मी जे काही केलंय, त्यामागे तुम्हा सर्वांची शक्ती आहे – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने गांधीजी आणि विनोबांचे विचार किती अवलंबले, याचं वास्तव तुम्हाला चांगलं माहित आहे – नरेंद्र मोदी
– काँग्रेसवाल्यांनो, तुमची शिवी माझ्यासाठी दागिना आहे – नरेंद्र मोदी
– शौचालय काँग्रेससाठी मस्करीचा विषय असेल, मात्र माझ्यासाठी माझ्या माता-भगिणींसाठी इज्जतीचा विषय आहे – नरेंद्र मोदी
– जनतेने यावेळी मतदानाआधीच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला
– पवारांच्या हातून पक्ष निसटतोय, पुतणे अजित पवार पक्षावर पकड वाढवतायेत – नरेंद्र मोदी
– दुष्काळालाही काँग्रेसच जबाबदार – नरेंद्र मोदी
– काँग्रेस-राष्ट्रवादीने शहिदांचा अपमान केला – नरेंद्र मोदी
– आझाद मैदानात हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली गेली नाही, याचं कारण काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होटबँक – नरेंद्र मोदी
– हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने हिंदूंना अपमानित करण्याचं काम केलंय – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने ज्या हिंदूंना दहशतवाद म्हटलं, ते आता जागे झालेत – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला – नरेंद्र मोदी
– काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही सीट मिळू देऊ नका – नरेंद्र मोदी