एक प्रसंग ज्यात मोदी अजित दादांचा इशारा करतायत पण शेवटी दादांच्याच आग्रहावर मोदी भाषणासाठी गेले, मानापमान नाट्यात काय घडलं?

| Updated on: Jun 14, 2022 | 7:12 PM

प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार यांना देहूतील कार्यक्रमात बोलू देणं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पण या कार्यक्रमात नेमकं काय झालं? पाहुयात...

एक प्रसंग ज्यात मोदी अजित दादांचा इशारा करतायत पण शेवटी दादांच्याच आग्रहावर मोदी भाषणासाठी गेले, मानापमान नाट्यात काय घडलं?
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देहूनगरीत आले होते. तेव्हा त्यांनी तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. पण सध्या राज्यभर एकाच गोष्टीची चर्चा होतेय. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीचे नेते भडकले. सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण पंतप्रधानांच्या भाषणावेळी नेमकं काय घडलं? खरंच अजित पवारांना डावलण्यात आलं का? पंतप्रधानांनी अजित पवारांना अपमानित केलं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हीडिओतून मिळतील.

प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवार यांना देहूतील कार्यक्रमात बोलू देणं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पण या कार्यक्रमात नेमकं काय झालं? पाहुयात…

व्हीडिओ

देहूतील कार्यक्रमात पंतप्रधानांना जेव्हा बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं तेव्हा मोदींनी आयोजकांना एक इशारा केला. अजित पवारांना बोलू असं त्यांनी आयोजकांना सुचवलं. शिवाय अजित पवारांना तुम्ही जाताय का असं विचारल्याचंही दिसतंय.

हे सुद्धा वाचा

“मोदीजी तुम्हीच भाषणाला जा”

पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांचा अपमान केल्याचं बोललं जातंय.  पण हा दुसरा व्हीडिओ पाहिला असता शेवटी अजित पवार यांनीच आग्रह केल्यानंतर मोदी भाषणाला उभे राहिल्याचं दिसतंय.

“कार्यक्रमाची रूपरेषा दिल्लीत ठरली”

देहूतील या कार्यक्रमाची रुपरेषा दिल्लीतून पंतप्रधान कार्यालायतून ठरवण्यात आली होती, अशी माहिती तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. पंतप्रधानांना राजभवनातील पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचायचं असल्याने कार्यक्रमात अजित पवारांचं झालं नसावं, असं सांगितलं जात आहे. तर पंतप्रधानांच्या या नियोजित पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या भाषणाचा उल्लेख नव्हता, असं भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटलंय.

“अजित पवारांना भाषण करू न देणं, हा महाराष्ट्राचा अपमान”

अजित पवार यांचं देहूच्या कार्यक्रमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून अमरावतीत केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.