शाळा सोडल्याचा दाखला दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं मोदींना आव्हान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री आणि देशाचे पाच वर्षे पंतप्रधान असताना, मागासवर्गीयांना त्यांनी काय दिले, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला प्रसिध्द करावा असे आव्हानही प्रकाश आंबेडकरांनी दिलं. ते अकलूजमध्ये बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांच्या […]

शाळा सोडल्याचा दाखला दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं मोदींना आव्हान
Follow us on

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री आणि देशाचे पाच वर्षे पंतप्रधान असताना, मागासवर्गीयांना त्यांनी काय दिले, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला प्रसिध्द करावा असे आव्हानही प्रकाश आंबेडकरांनी दिलं. ते अकलूजमध्ये बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज इथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

अकलूज येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मागासवर्गीय असल्यानेच आपल्यावर आरोप केले जात आहेत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावाचा आधार घेत डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी अकलूज येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली.  आपण मागासवर्गीय आहात तर  मागासवर्गीयांसाठी आपण किती योजना जाहीर केल्या तेही  सांगावे, असा सवाल आंबेडकरांनी विचारला. शिवाय आपला शाळा सोडल्याचा दाखला प्रसिध्द करावा, म्हणजे आम्हाला कळेल की आपण मागासवर्गीय आहात की नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदी काय म्हणाले होते?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची दोन दिवसांपूर्वी अकलूजमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी काँग्रेसने मला जातिवाचक शिव्या दिल्या. मला शिव्या द्या मी सहन करत आलोय. आता तर ते सर्व मागसलेल्यांना चोर म्हणतात, मात्र मी ते सहन करणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. याशिवाय काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं.

माढ्यात चुरस

माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. शिवसेना-भाजप युतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीने  संजय शिंदे यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही (VBA) माढ्यातून अ‍ॅड. विजय मोरे यांना तिकीट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपने माढा जिंकण्याचा चंग बांधला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही  अकलूजमध्ये सभा घेतली.

संबंधित बातम्या

काँग्रेसकडून मला जातीवाचक शिव्या, मोदींचा आरोप, कुटुंबाबाबत पवारांना उत्तर  

खरंच असदुद्दीन ओवेसींनी बुद्धविहारात जाणे टाळले का?   

माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे