“गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस” वाढदिवसानिमित्त मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेना-भाजप युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'धाकटा भाऊ' असा केला होता.

गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस वाढदिवसानिमित्त मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र
मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानीत दाखल झाले आहेत.
| Updated on: Jul 27, 2020 | 10:18 AM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केली. (PM Narendra Modi wishes CM Uddhav Thackeray on his birthday)

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रही पाठवले आहे. “वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे” असे मोदींनी म्हटले आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांकडून रात्री 12 वाजता अनोख्या शुभेच्छा

शिवसेना-भाजप युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा केला होता. परंतु, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जाताना दिसत नाही.

युती तुटल्यानंतर डिसेंबर महिन्यात मोदी आणि ठाकरे यांची पुण्यात पहिल्यांदा भेट झाली होती. राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचं स्वागत केलं होतं. देवेंद्र फडणवीस, अमित शाह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्धा त्यावेळी उपस्थित होते.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री ठीक बारा वाजता फोटो शेअर करुन मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी फोटो शेअर केला आहे, दोघंही जण एकाच गाडीत बसले असतानाचा. महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टिअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत. (PM Narendra Modi wishes CM Uddhav Thackeray on his birthday)