आधी शिवसेनेचा भाजपला धक्का, नंतर मनसेचा शिवसेनेला झटका, केडीएमसीत पूलांच्या लोकार्पणावरुन राजकारण

| Updated on: Mar 22, 2021 | 8:27 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेचा आजचा दिवस पूल दिवस होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही (Politics between MNS-Shivsena and BJP over the dedication of the bridge)

आधी शिवसेनेचा भाजपला धक्का, नंतर मनसेचा शिवसेनेला झटका, केडीएमसीत पूलांच्या लोकार्पणावरुन राजकारण
मनसे आमदार राजू पाटील यांनी वडवली उड्डाणपूल नागरीकांसाठी खुला केला
Follow us on

कल्याण (ठाणे) : अकरा वर्षांपासून काम सुरु असलेल्या वडवली रेल्वे उड्डाणपूल तयार झाला. आज पूलाचे लोकार्पण होते. मात्र, काही कारणास्तव लोकार्पण कार्यक्रम स्थगित झाला. तीच वेळ साधत मनसे आमदार राजू पाटील यांनी वडवली उड्डाणपूल नागरीकांसाठी खुला केला. पूल खुला होताच तात्काळ त्या पूलावर वाहतूक सुरु झाली. वाहन चालकांनी एकच जल्लोष केला. सकाळी कोपर पुलाचे गर्डर येताच डोंबिवलीत शिवसेनेने नारळ फोडत एकप्रकारे भाजपला झटका दिला तर संध्याकाळी मनसेने पूल खुला करत शिवसेनेला झटका दिला आहे (Politics between MNS-Shivsena and BJP over the dedication of the bridge).

पूलावरुन राजकारण नेमकं काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेचा आजचा दिवस पूल दिवस होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डोंबिवलीत कोपर पूलाचे गर्डर आज दाखल झाले. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, याच गर्डरवरुन सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली. त्यानंतर संध्याकाळी मनसेचे कार्यकर्ते, आमदार राजू पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष उ्ल्हास भोईर, अशोक मांडले वडवली पूलानजीक पोहचले. त्यांनी पूलाला लावलेले पत्र उखडून फेकून दिले आणि पूलाचे उद्घाटन केले.

शिवसेनेकडून लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द, मनसे आमदारांकडून लोकार्पण

मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पूलावरुन त्वरीत वाहतूक सुरु झाली. काही लोक आश्चर्यात पडले. पूलाचे लोकार्पण आज केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी, पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित होणार होते. ते आले नाही. काही कारणास्तव आजचा लोकार्पण कार्यक्रम जो पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होता. तो रद्द झाला. पण मनसे आमदारांनी हीच संधी साधत तिथे जाऊन पुलाचे लोकार्पण केले.

का केलं पूलाचं लोकार्पण?

नागरीकांना ताटकळत ठेवण्यापेक्षा पूल खुला व्हावा यासाठी या पूलाचे लोकार्पण केले, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कोपर पूलावरुन मनसे आमदारांनी सेना-भाजप दोघांवर निशाणा साधला. केवळ इव्हेट करणे हे यांचे काम आहे, असा टोला त्यांनी लगावला.

आणखी एका पूलाच्या लोकार्पणाच्या तयारीत होते राजू पाटील

कल्याण-मुरबाड मार्गावर दुसरा पूलही तयार आहे. मात्र वडवली पूलाचे लोर्कापणाची माहिती कळचात पोलीस फौजफाट्यासह पूलावर सज्ज झाली. त्वरीत बॅरेकेटींग करण्यात आली. त्यामुळे या पूलाचे लाोकार्पण टळले आहे. मात्र राजू पाटील हे या पूलावरुन चालत आले (Politics between MNS-Shivsena and BJP over the dedication of the bridge).

हेही वाचा : केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई