मोदी सरकार उद्या आर्मीही विकायला काढेल : प्रशांत भूषण

वर्ध्यातील सत्यनारायण बजाज वाचनालयात प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी संवैधानिक लोकशाही : वर्तमान आव्हाने या विषयावर बोलताना त्यांनी (Prashant Bhushan wardha) केंद्र सरकारच्या धोरणांवर आसूड ओढलं.

मोदी सरकार उद्या आर्मीही विकायला काढेल : प्रशांत भूषण
| Edited By: | Updated on: Nov 04, 2019 | 5:12 PM

वर्धा :  हे सरकार कधी काय विक्रीला काढेल, याचा काही अंदाज नाही.कधी म्हणतात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकून पैसे मिळवू, कधी बँका तर कधी रेल्वे विकू म्हणतात. कदाचित हे उद्या देशाची आर्मीही विकायला काढतील,असा घणाघात सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan wardha) यांनी केली. ते वर्ध्यात बोलत होते. वर्ध्यातील सत्यनारायण बजाज वाचनालयात प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी संवैधानिक लोकशाही : वर्तमान आव्हाने या विषयावर बोलताना त्यांनी (Prashant Bhushan wardha) केंद्र सरकारच्या धोरणांवर आसूड ओढलं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांना हटवून उर्जित पटेल यांना आणलं. सरकारने केलेली नोटबंदी त्यांनी चूपचाप सहन केली. सरकारनं रिझर्व्ह बँकेकडे जमा असलेल्या पुंजीची मागणी केली. पटेल यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनाही हटविण्यात आलं. त्यांच्याजागेवर अर्थशास्राशी संबंध नसलेल्या इतिहास विषयात पदवीधर असलेल्या गव्हर्नरची नियुक्ती केली. नामधारी नियुक्त्या करून सरकार सर्वच क्षेत्रात पाय पसरत आहे. बँकेतील पैसा काढून कार्पोरेट क्षेत्राला दिला जात असल्याचा आरोप, प्रशांत भूषण यांनी केला.

प्रशांत भूषण यांनी यावेळी राफेल विमान खरेदी प्रकरणावरुनही सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार कॅगचा रिपोर्ट येण्यापूर्वीच न्यायालयात रिपोर्ट सादर करते. त्यानंतर सरकारला पाहिजे तसा रिपोर्ट सादर केला जातो. प्रथमच संरक्षण क्षेत्रातील सौद्यातून किमतीचा तपशील हटवला गेल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी यावेळी केला.