90 टक्के चाकरमानी कोकणात पोहोचल्यावर बस-ट्रेन सुरु, ही कसली चेष्टा? : दरेकर

| Updated on: Aug 16, 2020 | 5:10 PM

जर आधीच ही व्यवस्था केली असती तर काय झाल असतं, असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला (Pravin Darekar on Konkan Special train) आहे.

90 टक्के चाकरमानी कोकणात पोहोचल्यावर बस-ट्रेन सुरु, ही कसली चेष्टा? : दरेकर
Follow us on

मुंबई : गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. जवळपास 90 टक्के लोक कोकणात पोचल्यावर तुम्ही बस-ट्रेन देताय? कसलंही नियोजन नाही, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. (Pravin Darekar on Konkan Special train for Ganeshotsav)

राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चेष्टा केली आहे. या ट्रेन आधीच सोडणं अपेक्षित होतं. मात्र केंद्रानं आधीच ग्रीन सिग्नल दिल्यानंतरही सरकारनं आतापर्यंत काय केलं. काल ट्रेन गेली त्यात 10-20 लोकं गेली. जर आधीच ही व्यवस्था केली असती तर काय झाल असतं, असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला आहे.

कोकणवासियांच्या उत्सवाचा बट्टयाबोळ या सरकारनं केला आहे. जवळपास 90 टक्के लोक कोकणात पोचल्यावर तुम्ही बस-ट्रेन देताय? कसलंही नियोजन नाही, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे.

कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सरकारकडून विशेष ट्रेन सुरु करण्यात आली. यानुसार काल (15 ऑगस्ट) कुर्ला टर्मिन्स आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स या स्थानकातून दोन गणपती स्पेशल ट्रेन रवाना झाल्या. मात्र या ट्रेनमध्ये फार प्रवासी नव्हते. काही डब्बे तर रिकामी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यात कुर्ला स्थानकातून रवाना झालेल्या रेल्वेमधून केवळ 11 प्रवासी रत्नागिरी स्थानकावर उतरले. तर सीएसएमटीवरुन रत्नागिरीत दाखल झालेल्या दुसऱ्या रेल्वेतूनही अवघे 16 प्रवासी उतरले. दोन रेल्वेमधून अवघे 27 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले. केवळ दोन दिवस आधी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे चाकरमान्यांनी या रेल्वेला फारसा प्रतिसाद दिला नाही. (Pravin Darekar on Konkan Special train for Ganeshotsav)

संबंधित बातम्या : 

कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ, रत्नागिरीत 2 ट्रेनमधून केवळ 27 प्रवाशी उतरले

Kokan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन, उद्यापासून तब्बल 162 रेल्वे धावणार