Kokan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन, उद्यापासून तब्बल 162 रेल्वे धावणार

भारतीय रेल्वे विभागाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे (Special trains for Kokan Ganeshotsav).

Kokan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन, उद्यापासून तब्बल 162 रेल्वे धावणार

मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे विभागाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे (Special trains for Kokan Ganeshotsav). कोकण रेल्वेने याबाबत अधिकृत घोषणा केलीय. यानुसार 15 ऑगस्टला पहिली रेल्वे गाडी सुटणार आहे.

14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत 162 गाड्या सुटणार आहेत. यात 81 अप तर 81 डाऊन गाड्यांचा समावेश असणार आहे. 15 ऑगस्टला निघालेली ट्रेन 16 ऑगस्टला कोकणात पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरुन ही पहिली ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. लवकरच याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्या चाकरमानन्यांना टोल माफ : एकनाथ शिंदे

या सर्व रेल्वे गाड्या आरक्षित असणार आहेत. यासाठी 15 ऑगस्टपासून तिकिट बुकिंग सुरु होणार आहे. मध्ये रेल्वे कोकणातील गणेशोत्सवासाठी एकूण 162 ट्रेन सोडणार आहे. या सर्व ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटतील.  या गाड्या सावंतवाडी रोड स्टेशन, कुडाळ स्टेशन आणि रत्नागिरी स्टेशनला जातील. मध्ये अनेक स्टेशनवर या गाड्या थांबणार आहेत. रेल्वे विभागाने या विशेष रेल्वे सुरु करत असतानाच प्रवाशांना कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या सर्व नियमांचंही पालन करण्यास सांगितलं आहे.

या सर्व गाड्या 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या काळात धावणार आहेत. सीएसएमटी-सावंतवाडी रोडी-सीएसएमटी या गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी दररोज रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सीएसएमटी स्टेशनवरुन निघेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ही गाडी सावंतवाडी रोड स्टेशनवर पोहचेल.

एलटीटी-कुडाळ-एलटीटी या गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी निघेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता कुडाळ येथे पोहचेल.

संबंधित बातम्या :

Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना टोलमाफी, सरकारचा चाकरमान्यांना दिलासा

Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

Special trains for Kokan Ganeshotsav

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *