मनपात चुरस आणि राज्यात एकमेकांसोबत, काँग्रेस-शिवसेनेने किती स्वैराचार करावा हाच खरा प्रश्न : प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका केली आहे (Pravin Darekar on Congress Shivsena Hathras case and Maratha Youth Suicide).

मनपात चुरस आणि राज्यात एकमेकांसोबत, काँग्रेस-शिवसेनेने किती स्वैराचार करावा हाच खरा प्रश्न : प्रवीण दरेकर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 01, 2020 | 3:31 PM

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका केली आहे (Pravin Darekar on Congress Shivsena Hathras case and Maratha Youth Suicide). मनपाच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस शिवसेनेत चुरस आहे, तर राज्यातील सरकारमध्ये ते एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांनी किती स्वैराचार करावा हाच मूळ प्रश्न असल्याचा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेच्या अशा दुटप्पी वागण्याचा उबग आल्याचंही म्हटलं.

प्रवीण दरेकर म्हणाले, “मनपात स्थायी समितीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस आहे. मात्र, राज्यात ते एकमेकांसोबत सरकारमध्ये आहेत हे काही पटत नाही. किती स्वैराचार करायचा हाच मूळ प्रश्न आहे. महाविकास आघाडीत मतभेद आहेत. एकमेकांविरोधात मतदान केलं, तर निकाल विरोधात लागू शकतो. हे सरकार अंतर्गत विरोधाने पडेल असं वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेला यांच्या अशा वागण्याने उबग आलाय. एकमताने निर्णय झालाय असा एक दिवस सांगा.”

“मराठा तरुणांचा मूक मोर्चा पाहिला, मग आता सरकारला ठोक मोर्चा पाहायचा आहे का?”

बीडमधील मराठा युवकाच्या आत्महत्येवर बोलताना त्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ते म्हणाले, “मी बीडला जाणार आहे. बीडमध्ये आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या तरुणाच्या घरच्यांची भेट घेणार आहे. सरकार उदासीन आहे. मराठा तरुणांचा मूक मोर्चा पाहिला. मग आता सरकार काय ठोक मोर्चा पाहू इच्छिते का? तात्पुरता काय दिलासा देता येईल याचा विचार करायला हवा.”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही कुठली मानसिकता?”

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता आहे. इथले अनेक मुद्दे आम्ही मांडले. हाथरस येथे जे घडलं ते निंदनीय आहे. जे घडलं त्याबद्दल सत्ताधारी गृहमंत्री काही बोलत नाही. महाराष्ट्रात ज्या बलात्काराच्या घटना घडतायत त्यावर बोलत नाहीत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही कुठली मानसिकता आहे.”

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बलात्कार होतात. त्या ठिकाणी संजय राऊत गेले का कधी? आता म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा. ना प्रतिक्रिया ना भेट, केवळ राजकारण करण्यासाठी यांना वेळ आहे. त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. जनतेला ठाऊक आहे की राजकारण कोण करतंय काम कोण करतंय,” असंही दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

Maratha Reservation : स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर

Pravin Darekar on Congress Shivsena Hathras case and Maratha Youth Suicide

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें