Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीची मते फुटली; तर बंगालमध्ये भाजपला फटका

| Updated on: Jul 18, 2022 | 5:04 PM

Presidential Election :शहजील इस्लाम बरेलीचे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. शहजील इस्लाम यांनी सातत्याने योगींवर टीका केली होती. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर मालमत्तांवर कारवाई केली होती. शहजील यांच्या एका पेट्रोल पंपावरही बुलडोझर फिरवण्यात आला होता.

Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीची मते फुटली; तर बंगालमध्ये भाजपला फटका
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीची मते फुटली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात क्रॉस व्होटिंग झाली आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीतील समाजवादी पार्टीचे आमदार शहजील इस्लाम यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना मतदान केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दिलेल्या प्रतिक्रियेननंतर शहजील इस्लाम चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझरने कारवाई करण्यात आली होती. गुजरातमध्ये राष्ट्रवादी, ओडिशा आणि आसाममध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत मुर्मू यांना मतदान केलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदारांनी यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना मतदान केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे यूपीए आणि एनडीएची डोकेदुखी वाढली आहे.

कुठे कुठे झाली क्रॉस व्होटिंग?

उत्तर प्रदेश : शहजील इस्लाम बरेलीचे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. शहजील इस्लाम यांनी सातत्याने योगींवर टीका केली होती. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर मालमत्तांवर कारवाई केली होती. शहजील यांच्या एका पेट्रोल पंपावरही बुलडोझर फिरवण्यात आला होता. शहजील इस्लाम यांनी आजम खान यांनाही पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, शहजील यांनी पक्षाच्याविरोधात जाऊन मुर्मू यांना मतदान केलं आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरात : गुजरातमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीचे आमदार कंधाल एस. जडेजा यांनी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे.

ओडिशा : काँग्रेसच्या आमदारांनी मुर्मू यांना मतदान केलं. त्यानंतर आम्ही अंतरात्म्याचा आवाज ऐकला असं सांगितलं. मी काँग्रेसचा आमदार आहे. पण मी मुर्मू यांना मतदान केलं आहे. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला. त्यामुळे मुर्मू यांना मतदान केलं, असं काँग्रेसचे ओडिशातील आमदार मोहम्मद मुकीम यांनी सांगितलं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी न लागल्याने मुकीम नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं सांगितलं जातं.

आसाम : AIUDFचे आमदार करिमुद्दीन बारभुईया यांनी काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने रविवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला फक्त दोन ते तीन आमदार आले होते. बाकी जिल्हा अध्यक्षच बैठकीला होते. त्यावरून काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याचं स्पष्ट होतं. काँग्रेसच्या तब्बल 20 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच, असं बारभुईया यांनी सांगितलं.

पंजाब : पंजाबमध्ये अकाली दलाचे आमदार मनप्रीत आयली यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

पश्चिम बंगाल: इतर राज्यात विरोधकांच्या मतात फूट पडलेली असतानाच पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदारांनी सिन्हा यांना मतदान केल्याचं वृत्त आहे.