AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

President Election – तृणमूलच्या आमदार बीरबाहा हांसदा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या धर्मावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाल्या, आदिवासी असूनही..

विधानसभेत आलेल्या तृणमूलच्या आमदार हंसदा म्हणाल्या आहेत की- मी पण एक आदिवासी महिला आहे. एक आदिवासी महिला म्हणून जेव्हा आम्ही धर्म लिहितो तो तेव्हा आम्ही सारी धर्म असे लिहितो.

President Election - तृणमूलच्या आमदार बीरबाहा हांसदा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या धर्मावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाल्या, आदिवासी असूनही..
द्रौपदी मुर्मु यांच्या धर्मावर प्रश्न - तृणमूल आमदारImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली – भाजपाप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (President Candidate )आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा न देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाने या निमित्ताने टीकास्त्र सोडलेलं आहे. ममता बॅनर्जी या आदिवासी विरोधी असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येते आहे. तसचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आदिवासी महिलेला राष्ट्रपती करण्याचे श्रेयही भाजपा घेण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपाच्या या टीकेनंतर आता तृममूल काँग्रेसही पुढ सरसावली आहे. तृणमूलच्या आमदार (TMC MLA)आणि संथाली अभिनेत्री बीरबाहा हंसदा यांनी सोमवारी द्रौपदी मुर्मु यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केला आहे. जर द्रौपदी मुर्मु या आदिवासी आहेत, तर त्या हिंदू असा धर्म का लावतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही बीरबाहा हंसदा यांनी केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी तृणमूल काँग्रेसने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिलेला आहे. सोमवारी मतदानासाठी प. बंगालच्या विधानसभेत पोहचलेल्या हंसदा यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

द्रौपदी मुर्मु यांच्या धर्मावर प्रश्नचिन्ह

विधानसभेत आलेल्या तृणमूलच्या आमदार हंसदा म्हणाल्या आहेत की- मी पण एक आदिवासी महिला आहे. एक आदिवासी महिला म्हणून जेव्हा आम्ही धर्म लिहितो तो तेव्हा आम्ही सारी धर्म असे लिहितो. मात्र द्रौपदी मुर्मु यांनी हिंदू धर्म असे लिहिले आहे. आम्ही संथाल आहोत, हिंदू नाही आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. बंगालमध्ये आम्ही सारी धर्माचे पालन करतो असेही हंसला यांनी सांगितले आहे. भाजपाने अशा उमेदवाराला उमेदवारी देण्याची गरज होती, जो धर्म म्हणून सारीचा उल्लेख करतो. असे केले असते, तर आम्ही त्याला विरोध करणार नाही. अशा प्रकारे दिशाभूल करण्याने काही उपयोग होणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. आदिवासींनाही हे चांगले कळते की कोण खरे बोलते आहे आणि कोण खोटे बोलते आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाचे आदिवासी कार्ड, बॅकफूटवर ममतादीदी

ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्याबाबत विधान केले होते. त्यात त्या म्हणाल्या होत्या की जर आम्हाला भाजपाच्या उमेदवाराचे नाव आधी माहित असते तर आम्ही याबाबत विचार केला असता. २०१० साली द्रौपदी मुर्मु या भाजपाच्या अनुसुचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य झाल्या होत्या. या वेळी प. बंगालमधील आदिवासींना आपलेसे करण्यासाठी भाजपाने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले. प. बंगालमध्ये पुढच्य वर्षी पंचायत समितीच्यानिवडमुका आहेत, तसेच २०२४ सालीही या मुद्द्य़ावर भाजपा आदिवासींची मते मिळवतील, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बंगालमध्ये आदिवासींचा मोठा वर्ग भजापाच्या समर्थनार्थ आहे, आणि ही व्होटबँक मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असेही सांगण्यात येते आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी या आदिवासी विरोधी आहेत असा प्रचार भाजपाकडून आता केला जातो आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.