भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ, ते परत जाऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याची वक्तव्य सुरु, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

| Updated on: Nov 27, 2020 | 7:21 PM

महाविकास आघाडी सरकारनं एक वर्ष पूर्ण केले ही मोठी उपलब्धी असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. Prithviraj Chavan criticize BJP leaders

भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ, ते परत जाऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याची वक्तव्य सुरु, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
Follow us on

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सलग 15 वर्ष सरकार चालवले. आताचे सरकार महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेसोबत आम्ही यापूर्वी काम केले नव्हते. जवळपास तिन्ही पक्षांची सदस्य संख्या सारखी होती. अनेकांना या सरकारच्या भवितव्याबाबत शंका होती. एक वर्ष सरकार टिकलं हे मोठी उपलब्धी असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षूपर्तीनिमित्त बोलत होते. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना एक हेतू होता. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये गेले होती. भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल म्हणून अनेक नेते भाजपात गेले होते. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत प्रवेश सुरु झाले आहेत. भाजपची सत्ता नसल्यामुळं काही नेते अस्वस्थ झाले आहेत. ते परत माघारी जाऊ नये म्हणून सरकार पडेल, असं सांगण्यात येते. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

मोदी सरकारवर टीका

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे सरकारचा पाया भक्कम आहे. तीन पक्ष मिळून जो निर्णय होईल तो आमचा निर्णय असतो. देशाची अर्थव्यवस्था कोलमडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370, राम मंदिर, नागरिकत्व दुरस्ती कायदा इतर विषयांना प्राधान्य देत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांच्याकडे अर्थव्यवस्थेवर मार्ग काढण्यासाठी उपाय नाहीत. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

केंद्र सरकारला कोरोनामध्ये यश मिळालेले नाही. आयसीएमआरच्या अध्यक्षांनी कोरोना लसी बाबत महिनभरात लसीच्या चाचण्या पूर्ण करण्याबाबतचे पत्र लिहिले होते. पंतप्रधानांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन घोषणा करण्यासाठी पत्र लिहिले गेले होते. आयसीएमआरच्या अध्यक्षांना अजूनही पदावरुन हटवण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदी सरकारला चीनचं आक्रमण रोखण्यात अपयश आल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कंगना रणौत, अर्णव गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी संबंध नाही. देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी कंगना रणौत, अर्णव गोस्वामी सारखे मुद्दे पुढे आणले जातात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/WU0VDpxeBn


संबंधित बातम्या:

Prithviraj Chavan | मविआची वर्षपूर्ती , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण LIVE

तुम्ही फडणवीसांना घाबरता का? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

गेल्या 10 वर्षापासूनच्या संपत्तीचे विवरण द्या, पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

(Prithviraj Chavan criticize BJP leaders)