तुम्ही फडणवीसांना घाबरता का? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

देवेंद्र फडणवीसांनी साम, दाम, दंड वापरुन काँग्रेस राष्ट्रवादीचे 40 नेते फोडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. | Prithviraj Chavan MVA Government

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 19:28 PM, 24 Nov 2020
Prithviraj Chavan

सातारा: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडले आहेत. मला काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. त्यापूर्वी शरदर पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील नोटीस आली होती. हा सर्व प्रकार निषेधार्ह आहे, असं काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. विरोधी पक्षांच्या प्रमुख माणसांना टार्गेट केले जातेय. सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात केलेले आर्थिक भ्रष्टाचार दिसत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. (Prithviraj Chavan told reason behind making MVA Government)

तुम्ही फडणवीसांना घाबरता का? या पत्रकारांच्या प्रशनावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी साम, दाम, दंड वापरुन काँग्रेस राष्ट्रवादीचे 40 नेते फोडले. महाविकास आघाडी सरकार स्थापन केले नसते तर आमचे राहिलेले नेतेही त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले असते. (Prithviraj Chavan told reason behind making MVA Government)

संस्थाचा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यावर त्यांच्यावर छापे टाकून मोडण्या करिता आणि पक्ष सोडून स्वत:कडे वळविण्यासाठी केला जात आहे. लोकांना जाणीवपूर्वक अडकवून ठेवले जात आहे. या प्रकरणांच्या शेवटी काहीही निष्पन्न झाले नसल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शरद पवार, अजित पवार यांना ईडीची नोटीस दिली होती. ज्यांनी दिली त्यांनीच ती माघारी घेतली. राजकीय कारणाकरता हे सर्व चालले आहे, हे निषेधार्ह आहे. पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स अशा प्रकरणातील परदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक केलेली कागदपत्रे तुमच्याकडे पडलेली आहेत. त्यापैकी किती जणांवर कारवाई झाली, पोकळ घोषणाबाजी बास झाली, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

काँग्रेसला अर्थव्यवस्थेबद्दल चिंता आहे. अर्थव्यवस्था गर्तेत गेली आहे. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होतो. आम्ही त्याबाबत आवाज उठवणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

फडणवीसांनी आमचे राहिलेले नेते नेले असते

महाविकासआघाडी सरकार स्थापन केले नसते तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) साम,दाम, दंड वापरुन आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे 40 मोठे नेते नेले त्याप्रमाणे राहिलेले इतर नेतेही नेले असते. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. आमच्याकडेही सत्ता होती पण आम्ही साम, दाम, दंड आणि संस्थांचा वापर केला नव्हता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आमच्या पक्षात निवडणुकीदरम्यान विसंगती आढळली तर आम्ही दुरुस्ती करु, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (Prithviraj Chavan told reason behind making MVA Government)

केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीनं वापर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही काही केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा आरोप केला. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

मी बोललो तर मला त्रास दिला, पवारसाहेबांना नोटीस दिली, विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर : छगन भुजबळ

(Prithviraj Chavan told reason behind making MVA Government)