आम्ही शहीद होऊ, पण गुडघे टेकणार नाही, शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी : संजय राऊत

आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:40 PM, 24 Nov 2020

मुंबई : “शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासारख्या शिवसेनेच्या प्रवक्ते-नेते- आमदार-खासदारांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या, त्यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे” असा घणाघाती आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. सरनाईक कुटुंबाच्या घर, कार्यालयांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर प्रताप सरनाईक परदेशातून मुंबईत परतले. सरनाईक यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांना ताब्यात घेऊन कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी सुरु केली आहे. (Sanjay Raut reacts after meeting Shivsena MLA Pratap Sarnaik raids by ED)

“हे फक्त राजकीय प्रकरण आहे. शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडल्या. एका चॅनलविरोधात असो किंवा अन्वय नाईक प्रकरण असो, त्यामुळे काही जणांच्या पोटात ही मळमळ-जळजळ सुरु असावी. विरोधी पक्षाच्या आमदार-खासदारांची दडपशाही करण्याचा प्रयत्न असेल. पण आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही शहीद होऊ महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“हे प्रकरण त्यांनाही माहिती नाही. काही न करता असे 40-50 लोक दिल्लीतून येतात आणि त्यांच्या मुलाला घेऊन जातात. फौजफाटा घेऊन येतात, ही झुंडशाही असून, यंत्रणेद्वारे आणीबाणी लावण्याचा प्रकार आहे. लहान सहान त्रुटी असतील चौकशी होऊ शकते. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. ज्याच्या लहान मुलाला ईडी घेऊन गेले त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसणार नाही का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

संजय राऊत, त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्यासोबत प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील ‘सामना’ कार्यालयात दीड तास चर्चा केली.

काय आहे प्रकरण ?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही. ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

कुठे कुठे कारवाई?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली. ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. (Sanjay Raut reacts after meeting Shivsena MLA Pratap Sarnaik raids by ED)

संबंधित बातम्या :

आमदार प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

मी बोललो तर मला त्रास दिला, पवारसाहेबांना नोटीस दिली, विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर : छगन भुजबळ

भाजपचं सरकार असलेल्या राज्यात ईडीची रेड पडल्याचे दिसले नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज

(Sanjay Raut reacts after meeting Shivsena MLA Pratap Sarnaik raids by ED)