गेल्या 10 वर्षापासूनच्या संपत्तीचे विवरण द्या, पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. (Prithviraj chavan get Income Tax Notice)

गेल्या 10 वर्षापासूनच्या संपत्तीचे विवरण द्या, पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 3:46 PM

कराड (सातारा) : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यात गेल्या दहा वर्षांपासूनचे संपत्तीचे विवरण द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर ही नोटीस आल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. (Prithviraj chavan get Income Tax Notice)

गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे वितरण द्या. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असे आयकर विभागाने यात नोटीसमध्ये म्हटलं आहे.

या नोटीसनंतर याबाबत पृथ्वीराज चव्हाणांकडून योग्य ती कार्यवाही सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता मला ही नोटीस आली आहे. त्याचे मी रितसर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

“दिवाळीच्या शुभमूर्हतावर मोदी सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने मलाही एक नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक नोटीस शरद पवारांना पाठवली होती. इन्कम टॅक्स विभाग हा केंद्राचा विभाग आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना अशाप्रकारे नोटीस पाठवल्या जातात. भाजपच्या कोणत्या नेत्याला नोटीस पाठवली आहे, याची माहिती नाही. मी मला पाठवलेल्या नोटीसला रितसर उत्तर देईन. ही रेगुल्यर नोटीस आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

“सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, हे भाजपला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. केंद्रातील भाजपा सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस पाठवत आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.(Prithviraj chavan get Income Tax Notice)

संबंधित बातम्या :

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा… : पृथ्वीराज चव्हाण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.