AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे सामुहिक बलात्कार प्रकरण; भाजपने आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा, राष्ट्रवादीचा पलटवार

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत असे बोलून राजकारण करत आहे, ते न करता आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे पहावे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

पुणे सामुहिक बलात्कार प्रकरण; भाजपने आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा, राष्ट्रवादीचा पलटवार
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 07, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : पुण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्न करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. तर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत असे बोलून राजकारण करत आहे, ते न करता आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे पहावे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. (Nawab Malik criticizes BJP leaders over Pune gang rape)

जे भाजप नेते राज्यसरकारवर आरोप लावत आहेत त्यांच्या खासदार, आमदारांनी आणि नेत्यांनी केलेले कुकर्म आठवावे. सेंगर, उन्नाव सारख्या व उत्तरप्रदेशमध्ये अशा अनेक घटना त्याकडे लक्ष द्यावे आणि मग अशाप्रकारचे आरोप करावे, असा खोचक सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे जो कुणी कुकर्म करेल तर त्याला सोडण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, पुणे सामुहिक बलात्कार प्रकरणात 11 लोकांना अटक झाली आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल असंही मलिक यांनी यावेळी सांगितलं.

रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबित

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात या दोघा रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाई त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

इतर बातम्या :

गावी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गोड बोलून रेल्वे स्थानकाबाहेर आणलं, नंतर अपरहरण करुन दोन दिवस सलग सामूहिक बलात्कार, पुणे हादरलं

VIDEO: मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ

Nawab Malik criticizes BJP leaders over Pune gang rape

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!