AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील ‘या’ मंत्र्याला विश्वास

Dharmaraobaba Atram on Jayant Patil : नवरात्रीआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, असा दावा अजित पवार गटातील मंत्र्याने केला आहे. 'या' मंत्र्याने तारीख सांगितली आहे. तसंच जयंत पाटील अजित पवार गटातील नेत्यांनं म्हटलं आहे. यासह अन्य मुद्द्यावरील सविस्तर प्रतिक्रिया, वाचा...

Jayant Patil : जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील 'या' मंत्र्याला विश्वास
Image Credit source: Jayant Patil FB
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 12, 2023 | 2:38 PM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी- पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राष्ट्रवादीतील दिग्गज नेते त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. तेव्हा काही नेते शरद पवार यांच्याचसोबत राहण्यावर ठाम होते. त्यातलंच एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील हे अजित पवार गटात सामील होतील, असा दावा करण्यात आला आहे. जयंत पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यापैकीच काही जणं आमच्याकडे लवकरच येतील. जयंत पाटीलही आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे, असं मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवडूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदारांचं संख्याबळ आहे. जिल्हा अध्यक्ष आहेत. चिन्ह मिळायला आम्हाला काही हरकत नाही. निवडणूक आयोग निष्पक्षपने काम करतं. तरुण पुढे येत आहेत. मोठ्यांचे आशीर्वाद मिळावेत. अजित दादा फक्त विकासकामांसाठी पुढे आले आहेत. 100 टक्के पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे राहील, असा विश्वासही धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ आणि वरिष्ठ पातळीवर असलेल्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. पण अजितदादांनी शपथ घेतली. तेव्हा त्यांना आशीर्वाद असणारच, असं म्हणत धर्मरावबाबा आत्राम यांनी छगन भुजबळांच्या टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीतील दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरही धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल. नवरात्रीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.

सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे जे ड्रग्स पुण्यात येत आहेत. त्यावर कारवाई केली जाईल. चार महिने धाड मोहीम राबवली जाईल. भेसळ युक्त तूप, पनीर याच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी भरारी पथकंही तयार करणार आहोत, असंही ते म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?